आजचा युवा प्रचंड हुशार अन् आशावादी

13 Jan 2025 07:00:00
पराग मगर
नागपूर,
Ankush Chaudhary : आजचा युवा प्रचंड आशावादी आहे. त्याला काय करायचं आहे यापेक्षा काय करायचं नाही याबाबत त्याच्या धारणा पक्क्या आहे. त्यामुळे पाठीवर विश्वासाची थाप असू द्या असे मत प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांनी व्यक्त केले. ते नागपुरात आले असता तभा प्रतिनिधींशी त्यांनी युवा दिनी खास संवाद साधत आजच्या युवांबाबत त्यांना काय वाटते याविषयी दिलखुलास चर्चा केली. आजचे युुवा केवळ मोबाईलवर पडीक असतात. समाजमाध्यमे व खास करून रिल्समुळे ती वाया जात आरोप होतो.
 
 
 
ankush-chaudhari
 
 
 
याविषयी अंकुश म्हणाले, प्रत्येक पिढीमध्ये नव्या गोष्टी समाविष्ट होत असतात. तंत्रज्ञानाने ही गती वाढली आहे. आमच्या लहानपणी मी देखील इतरांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही पहायला जायचो. त्यावेळी आमच्यावरदेखील ही पिढी टिव्हीच्या आहारी गेली असा आरोप व्हायचा. त्यामुळे प्रत्येकच जुन्या पिढीकडून पुढच्या पिढीवर हा आरोप होतोच. आणि पिढी ती चुकीचा ठरवत असल्याचे ते म्हणाले. आजच्या पिढीची स्ट्रेन्थ काय या प्रश्नावर अंकुश सांगतात, आजची पिढी खूप हुशार आहे. त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. ते कुठल्याही गोष्टीचा अ‍ॅग्रेसिव्ह पद्धतीने अ÷भ्यास करतात. नव्या पिढीबद्दलच्या निरीक्षणाबद्दल अंकुश सांगतो, आमच्या क्षेत्रात युवा लेखक, दिग्दर्शक खूप सुंंदर कल्पना घेऊन येत आहेत. सुंदर नाटक करीत आहेत. त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा फार वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्यापासून काही शिकायचे असेल तर मला त्यांचे होऊन ऐकावे लागेल.
 
 
 
आजची पिढी वाचनापासून दूर गेल्याच्या आरोप खोडून काढताना अंकुश म्हणाले, युवा वाचनापासून तितकासा दूर गेलेला नाही तर त्याचे वाचनाने फॉर्मॅट बदलले आहे. तो मुलाखती ऐकतो. मोबाईलवर वाचतो. युवांना त्यांच्या नजरेतून समजून घेण्याची गरज अंकूशने यावेळी बोलून दाखविली.
 
 
व्ही शांताराम साकारण्याची इच्छा
 
 
अंकुश चौधरी यांनी आजवर दुनियादारी, दगडी चाळ, डबल सीट, क्लासमेट, पोरबाजार अशा विविध चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. २०२३ मध्ये आलेल्या महाराष्ट्र शाहीर या सिनेमात त्याने शाहीर साबळेची भूमिका जिवंत केली. आता कुणाची भूमिका इच्छा आहेस, असे विचारले असता सिनेमा खर्‍या अर्थाने जगणारे व काळाच्या पुढचे चित्रपट तयार करणारे चित्रपती व्ही शांताराम यांची भूमिका करण्याची मनापासून इच्छा तभाला बोलून दाखविली.
Powered By Sangraha 9.0