Steve Jobs wife in mahakumbh उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू झाला आहे, जिथे सर्वत्र राम भजन आणि जयजयकार ऐकू येत आहेत. महाकुंभ हा केवळ देशातच नव्हे तर परदेशातही चर्चेचा विषय बनला आहे. परदेशातूनही भाविक महाकुंभात येत आहेत. दरम्यान, अॅपल कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल देखील प्रयागराजला पोहोचल्या असून त्यांच्या गुरु स्वामी कैलाशानंद महाराज यांच्या आश्रमात राहत आहेत. स्टीव्ह जॉब्सची पत्नी लॉरेन पॉवेल तिच्या ४० सदस्यांच्या टीमसह महाकुंभासाठी पोहचल्या आहे. दरम्यान लॉरेन पॉवेल या साध्वीच्या वेषात महाकुंभात दिसल्या. त्यांनी भगवे वस्त्र आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण केलेली दिसत आहे. येथे लॉरेन पॉवेल कल्पवास करेल आणि ऋषींच्या सहवासात साधे जीवन जगेल.
हेही वाचा : आजचा युवा प्रचंड हुशार अन् आशावादी
शनिवारी त्या निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी यांच्या आश्रमात पोहोचल्या होत्या. त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट दिली. तिथे त्या गुलाबी सूट आणि पांढऱ्या दुपट्ट्यात दिसल्या. Steve Jobs wife in mahakumbh त्यांनी मंदिरात पूजा केली. लॉरेन पॉवेल यांची सनातन धर्मावर गाढ श्रद्धा आहे. यासोबतच, त्या केवळ गुरु स्वामी कैलाशानंद यांनाच आपले गुरु मानत नाही तर त्या त्यांना आपले वडील मानते. गुरु स्वामी कैलाशानंद यांनीही लॉरेन पॉवेलला त्यांची मुलगी म्हटले आहे हे विशेष. स्वामी कैलाशानंद यांनी सांगितले की, सनातन धर्मात सामील झाल्यानंतर लॉरेन पॉवेल यांना अच्युत गोत्र देण्यात आले आहे. यासोबतच त्यांचे नाव लॉरेन पॉवेल वरून कमला असे बदलण्यात आले आहे. ते म्हणाले, त्या ध्यान करण्यासाठी भारतात आल्या आहे. शाही स्नान आणि मौनी अमावस्येच्या निमित्ताने त्या महाकुंभात शाही स्नान करतील. यातील एक स्नान १४ जानेवारी रोजी आणि दुसरे २९ जानेवारी रोजी होईल. अशा परिस्थितीत, तोपर्यंत त्या इथेच राहील असे म्हटले जात आहे.