साप्ताहिक राशिभविष्य
मेष (Aries Zodiac) : प्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान आपणास आर्थिक लाभ देणारे आहे, असे दिसते. आपला राशिस्वामी मंगळ सुखस्थानातून कर्म स्थानाला व लाभ स्थानाला बळ देत आहे. तर, चंद्र पराक्रमातून भाग्य स्थानाला पाहात आहे. त्यामुळे मान, सन्मान, प्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न राहील; तथापि यामुळे काहींना एखादेवेळी अहंकार धोका निर्माण होऊ शकतो. एखाद्याशी भांडण निर्माण झाल्यास प्रथम स्वतःची बाजू तपासून पाहा. कार्यालयीन कामकाजात अडथळे, वादविवाद निर्माण होऊ शकतात. भाग्येश गुरू या राशीच्या युवावर्गाला विवाह योगासाठी लवकरच उत्तम संधी आणू शकतो.
शुभ दिनांक - १४, १५, १६, १७.
वृषभ (Taurus Zodiac): आर्थिक प्रगतीचा आठवडा
या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान कार्यालयीन व्यवसाय व विशिष्ट कार्यक्षेत्रातील कर्मचार्यांची प्रगती यासाठी उपयोगी दिसते. राशिस्वामी शुक्र आपल्या कुंडलीच्या कर्मस्थानातून योगकारक शनीसोबत भ्रमण करीत आहे. चंद्र धनस्थानातून या सप्ताहाचे भ्रमण सुरू करीत सुखस्थानापर्यंत जाणार आहे. हे देखील शुभावह असल्याने आपली आर्थिक बाजू मजबूत करण्यास मदत करणारे ठरेल. त्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रगतीचा आठवडा राहील. अष्टमातील काहींना आरोग्याचा त्रास निर्माण होऊ शकतो. त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ दिनांक - १२, १४, १६, १८.
मिथुन (Gemini Zodiac): सर्वांगीण प्रगतीला बळ
Weekly Horoscope : या आठवड्यात आपल्याला अतिशय उत्तम ग्रहमान लाभलेले दिसत आहे. आपला राशिस्वामी बुध या सप्ताहाच्या सुरुवातीला रवीसोबत सातव्या स्थानात आहे. त्याचा हा मुक्काम आपल्या व्यक्तिमत्त्वासह सर्वांगीण प्रगतीला बळ आहे. शिवाय चंद्र धनस्थानातून या सप्ताहाचे भ्रमण सुरू करीत आहे. त्यामुळे सध्या तरी आलबेल स्थिती आपण अनुभवणार आहात. दरम्यान, शनी-मंगळाच्या द़ृष्टीमुळे काही मंडळींना प्रकृतीविषयक काही त्रास उत्पन्न होऊ शकतो. तसे झाल्यास मुळीच दुर्लक्ष करू नये. त्यांनी प्रकृतीची सर्वाधिक काळजी घेणे जरूरी आहे. नोकरी-व्यवसायात समाधानकारक वातावरण राहील. सहकार्यांशी सलोखा ठेवावा.
दिनांक - १४, १५, १६, १७.
कर्क (Cancer Zodiac): खर्चिकपणा बळावण्याची शक्यता
Weekly Horoscope : राशिस्वामी चंद्राचे व्यय स्थानापासून होणारी सुरुवात या आठवड्यात आपली खर्चिक वृत्ती जरा अधिक वाढण्याची शक्यता दाखवते. या सप्ताहात सढळ हाताने खर्च करण्याची सवय बळावेल. आपल्या राशीत मुक्कामाला असलेला मंगळ त्याला खतपाणीच घालेल. साधारण अनुकूल स्वरूपाच्या अन्य ग्रहस्थितीमुळे आपल्या कामकाजात नोकरी-व्यवसायात उद्दिष्ट्यपूर्ती करून आपला उत्साह टिकवून ठेवता येणार आहे. काहींना मात्र कौटुंबिक वातावरणात थोडासा तणाव अनुभवास येऊ शकतो. भाऊबंदकीच्या प्रकरणातून मनभेद निर्माण होऊ शकतो. प्रिय व्यक्तींशी कलह टाळा.
शुभ दिनांक - १४, १६, १७, १८.
सिंह (Leo Zodiac): उत्कर्षाला सत्शीलतेचे बळ
या आठवड्यात पंचमात असलेला आपला राशिस्वामी रवी आपणास अनेक शुभयोग व संधी लाभण्याची हमी देत आहे. त्याच्यासोबत धनेश बुधानेही उत्तम गट्टी जमवलेली आहे. अशात चंद्र लाभस्थानापासून भ्रमण सुरू करून आपल्या राशीत मुक्कामाला येणार आहे. त्याचा हा प्रवास सिंह राशीच्या लोकांच्या उत्कर्षाच्या मार्गातील सार्या अडचणींचा निपटारा करण्यास समर्थ आहे. हे भ्रमण आपल्या उत्कर्षाला सत्शीलतेचे बळ देणारे आहे. आठवडाअखेरीस काहींना आरोग्याबाबत काही उत्पन्न होण्याची शक्यता आहे. विशेषतः काही ज्येष्ठ व्यक्तींना पोटाचे त्रास निर्माण होऊ शकतात.
शुभ दिनांक - १२, १४, १६, १८.
कन्या (Virgo Zodiac): कार्यक्षेत्रात उत्साहाचे वातावरण
आपल्या कार्यक्षेत्रात उत्साह व समाधानाचे वातावरण निर्माण करणारा हा आठवडा आहे. आपला राशिस्वामी बुध सुखस्थानात रवीसोबत असून तो दशम कर्म स्थानाला बळ देत आहे तर गुरूची आपल्या राशीवर शुभ दृष्टी येत आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे सुखकर असाच हा सप्ताह आपल्यासाठी असणार आहे. आर्थिक बाजू अतिशय उत्तम राहील. कुटुंबात वादविवाद निर्माण होण्याची तसेच काहींना घरापासून दूर जाण्याचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता राहील. सप्तमातील राहू व आपल्या राशीतील केतू असे प्रसंग निर्माण करू शकतात. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
दिनांक - १३, १५, १६, १८.
तूळ (Libra Zodiac): परिश्रमाचे चीज होणार
Weekly Horoscope : आपला राशिस्वामी शुक्र पंचम योगकारक शनीच्या बरोबरीने मुक्कामाला आहे तर चंद्र भाग्यस्थानातून या सप्ताहाचे भ्रमण सुरू करीत आहे. याहून आणखी शुभ स्थिती काय म्हणायची. सध्या आपणास चौफेर शुभ योगांचा, उपयोगी ठरणार्या संधींचा लाभ देण्यास ही ग्रहस्थिती बलवान ठरणार आहे. आठवड्यात आपणास भरपूर उत्साह व मनोबल लाभावा. कर्मस्थानी असलेल्या मंगळाचे अचानक व आश्चर्यकारक स्वरूपात सहाय्य मिळेल. आर्थिक स्थिती वृद्धिंगत होऊ लागेल. आपल्या परिश्रमाचे चीज होत असल्याचा आनंद लाभेल. नोकरी-व्यवसायात उत्साह जाणवेल.
शुभ दिनांक - १२, १४, १६, १७.
वृश्चिक (Scorpio Zodiac): आर्थिक आघाडीवर निश्चिंत
दीर्घकाळापासून आपला राशिस्वामी मंगळ सध्या भाग्यस्थानी मुक्काम बसला आहे. तेथे तो कमजोर असला, तरी चंद्राच्या उत्तम योगात आल्यावर उत्तम बळ देण्यास आतुर आहे. त्यामुळे या सप्ताहाची सुरुवात काहीशी कष्टमय झाली तरी लगेच मंगळ व चंद्र एकत्र येऊन आपणास उत्तम आर्थिक बळ व सुसंधीची कमी पडू देणार नाही. धनस्थानी रवीसह बुध असल्यानेही विविध मार्गाने पैशाची आवक राहून आघाडीवर चिंता राहणार नाही. कुटुंबात मंगलकार्याच्या सफल हालचाली होऊ शकतील. नोकरी-व्यवसायातील स्पर्धेवर मात करून वरचष्मा निर्माण करू शकाल. व्यावसायिक स्पर्धेत आघाडी राहील.
शुभ दिनांक - १४, १५, १६, १७.
धनु (Sagittarius Zodiac): प्रवासात सतर्क राहावेWeekly Horoscope : राशिस्वामी गुरू सध्या सहाव्या कर्मस्थानातून आपली आर्थिक व कार्यक्षेत्रातील क्रियाशीलतेची बाजू उत्तमरीत्या सावरत असतानाच आपल्या राशीत मुक्कामास रवी व बुध उत्तमोत्तम संधीचा लाभ देण्यास आतुर आहेत. या सप्ताहात चंद्रही सप्तम स्थानातून भ्रमण सुरू करीत भाग्यस्थानात येणार आहे. या योगांमुळे आपले मनोबल व उत्साह टिकून राहणार आहे. कार्यक्षेत्रात तसेच कुटुंबात आपला वट राहील. सध्या आपल्यापैकी काहींच्या पायाला जणू भिंगरी लागली असेल. वारंवार प्रवासाचे योग येतील. स्थानांतर घडू प्रवासात सतर्क राहायला हवे.
शुभ दिनांक - १४, १६, १७, १८.
मकर (Capricorn Zodiac): विविध क्षेत्रांत प्रगतीचे योग
राशिस्वामी शनी सध्या योगकारक शुक्राच्या सोबतीने धनस्थानी असल्यामुळे तो आर्थिक प्रगतीस अतिशय अनुकूल आहे. अशातच साडेसातीचा शेवटचा टप्पा लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शनी प्रभावीपणे सध्या आपले काम करीत आहे. आपल्या राशीवर शुभंकर शुभद़ृष्टी आहे. हे उत्तम स्वरूपाचे लाभलेले ग्रहमान आपल्याला विविध क्षेत्रात प्रगतीचे योग देणारे आहे, व्यावसायिक यश व आर्थिक प्रगतीचा हा काळ दर्शवीत आहेत. जोडीदाराचे व्यावसायिक सहकार्य तसेच भागीदारीच्या व्यवसायात यश मिळण्याचे योग प्रबळ होताना दिसतात.
शुभ दिनांक - १३, १४, १५, १७.
कुंभ (Aquarius Zodiac): कार्यसिद्धीचे समाधान मिळेल
Weekly Horoscope : राशिस्वामी शनी सध्या मुक्कामाला असल्याने बलवान तर आहेच; शिवाय तो योगकारक शुक्राच्या सहवासाने अतिशय अतिशय उत्साहाने परिपूर्ण व शुभबळाने सुखावला आहे. यामुळे आपणास उत्तम कार्यसिद्धी व यशाचे मानसिक समाधान देणारा हा सप्ताह आहे. आपणांस व्यवसायात उत्तम अर्थलाभ होईल. कार्यक्षेत्रात स्पर्धेचे वातावरण असेल तर त्यात आपली सरशी होईल. व्यासायिक व सामाजिक मानसन्मानाचे योग कौटुंबिक वातावरण समाधानाचे राहील. आरोग्य स्थानातील उपद्रवी मंगळामुळे काहींना प्रकृतीबाबत काहीसे त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. स्वभावात काहीशी तीव्रता निर्माण होऊ शकते.
शुभ दिनांक - १४, १५, १६, १७.
मीन (Pisces Zodiac): व्यवसायात नवनवीन संधी
Weekly Horoscope : या आठवड्यातात आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या समाधानकारक ग्रहयोग लाभले आहेत. पराक्रमातील राशिस्वामी भाग्यासह लाभस्थानालाही बळ देत आहे. तर दशमस्थ असलेला रवी व्यवसाय व आपल्या कार्यक्षेत्रात विविध उपयुक्त संधी निर्माण करण्यास उपयोगी ठरू शकणार आहेत. अशात चंद्र सुखस्थानातून भ्रमण सुरू करणार आहे. ही स्थिती आपल्या व्यावसायिक यशास अनुकूल आहे. व्यवसायात किंवा नोकरीत फायदा, नवनवीन संधी लाभण्याच्या रूपाने उपयोगी सप्ताह आहे. आर्थिक आवक समाधानकारक राहील. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल.
शुभ दिनांक १३, १४, १५, १६.
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, ८६००१०५७४६