दुचाकी अपघातात एक जण जखमी

    दिनांक :14-Jan-2025
Total Views |
कारंजा लाड, 
accident news : प्रवास करीत असताना अचानकपणे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघातात एक ३५ वर्षीय व्यक्ती जखमी झाला. अपघाताची ही घटना कारंजा मूर्तिजापुर मार्गावर घडली.
 
 
 
acc
 
 
 
अमोल वाल्मीक मोकले असे जखमीचे नाव असून, तो अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा येथील रहिवाशी असल्याची माहिती रुग्णालयातील नोंदीवरून प्राप्त झाली आहे. अपघाताच्या घटनेनंतर त्याला उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील नोंदीवरून प्राप्त झाली आहे.