पिरेडमध्ये लिकेजचा त्रास होतोय ?

14 Jan 2025 19:17:43
Period Leaking प्रत्येक महिलेला तिच्या आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर मासिक पाळीच्या वेळी वेदना आणि कळ येत असतेच.अनेक वेळा मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो ज्यामुळे ब्लड लिकेजची भीती असते, तर काही महिलांना रक्त गळतीची समस्या उद्भवली असेल. या गळतीमुळे कपड्यांवर डाग पडतात. विशेषतः रात्रीच्या वेळी लिकेजची समस्या जास्त त्रासदायक असते.
 
 
 
period
 
 
 
चुकीचा पॅड वापरणे
रात्री किंवा Period Leaking जास्त ब्लड फ्लो असताना लांब आणि विंग्स पॅड वापरावेत. विंग पॅड वापरल्याने वळताना गळतीची समस्या उद्भवत नाही. जर तुमची मासिक पाळीचा फ्लो कमी झाला तर तुम्ही अल्ट्रा विंग्ज पॅड्स वापरू शकता.
 
मासिक पाळीच्या पँटीज
पॅड वापरल्यानंतरही Period Leaking गळतीची समस्या येत असेल तर तुम्ही पीरियड पॅन्टी वापरू शकता. मासिक पाळीच्या पँटीज सामान्य अंडरवेअरपेक्षा खूप वेगळ्या असतात. या पँटीमध्ये तीन थर आहेत जे गळती रोखतात. पीरियड पँट वापरल्याने गळती जवळजवळ नाहींच्या बरोबरीत असते. परंतु,या पीरियड पँटीज खूप महाग असतात.
 
मेन्स्ट्रुअल कप
मासिक पाळी Period Leaking दरम्यान, मेन्स्ट्रुअल कप वापरल्याने लिकेजची समस्या उद्भवत नाही. मासिक पाळीचा कप रबर आणि सिलिकॉनपासून बनलेला असतो. हा कप वापरल्यानंतर, तो कप ८ ते १२ तासांत रिकामा करावा लागतो. मासिक पाळीचा कप बराच काळ वापरता येतो.
 
दिवसाला लिकेज
दिवसा लिकेज Period Leaking पॅड न बदलल्यामुळे असू शकते. अनेक वेळा महिला आळशीपणामुळे पॅड बदलत नाहीत. ज्यामुळे, गळतीची समस्या उद्भवते. मासिक पाळीच्या जास्त प्रवाहादरम्यान, दर ३ ते ४ तासांनी पॅड बदलायला पाहिजे.
Powered By Sangraha 9.0