तुम्हीही पाहता सतत रील ? तर हे आजार होऊ शकतात

    दिनांक :14-Jan-2025
Total Views |
Reel addiction सोशल मीडियावर रील किंवा छोटे व्हिडिओ पाहणे हा आजकाल लोकांमध्ये ट्रेंड बनत चालला आहे. केवळ घरीच नाही तर बाजारात किंवा ऑफिसमध्येही अनेक लोक रील पाहताना दिसतात. लोकांना थोडा वेळ मिळाला की, त्यांना कोणाशीही बोलणे किंवा वाचणे आवडत नाही.त्याऐवजी, ते मोबाईलवर रील्स पाहण्यात व्यस्त होतात, पण तुम्हाला माहिती आहे का रील्स पाहणे किती धोकादायक आहे ? नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, रील पाहणे किंवा स्क्रीन टाइम वाढवणे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. जर तरुण लोक झोपेच्या वेळी स्क्रीनवर जास्त वेळ घालवत असतील तर त्यांना उच्च रक्तदाब होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत वाढतो.
 
 
reel
 
 
सतत रील्स पाहण्याने शरीर आणि मन सक्रिय राहते. यामुळे, दोघांनाही विश्रांती मिळत नाही. अशा परिस्थितीत, तणावाची पातळी वाढू शकते. ज्यामुळे, उच्च रक्तदाब होऊ शकतो. स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने झोपेची गुणवत्ता देखील खराब होते. आणि त्याचा हृदय व मेंदूवर वाईट परिणाम होतो.
संशोधनातील धक्कादायक सत्य
अलीकडेच, Reel addiction बीएमसी जर्नलने चीनमधील ४,३१८ तरुण आणि मध्यमवयीन लोकांवर एक अभ्यास केला. त्या अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक रील पाहण्यात जास्त वेळ घालवतात त्यांना हाय बीपी आणि हायपर टेन्शनचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त असते. हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर यांनी असेही सांगितले की, रीलचे व्यसन असलेल्या तरुण आणि मध्यमवयीन लोकांना हाय बीपी आणि हायपर टेन्शनचे धोका जास्त असतो. हे टाळण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या मते, स्क्रीनवर जास्त वेळ घालवण्यापेक्षा काही लोकांशी बोलणे चांगले. किंवा दुसरे काहीतरी करा.
 
रीलचे व्यसन वाईट
संशोधनात, Reel addiction झोपेच्या वेळी रील्स पाहण्यासाठी अलर्ट करण्यात आले आहे.त्यात पुढे म्हटले आहे की, "पारंपारिक स्क्रीन टाइममध्ये टेलिव्हिजन पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे आणि संगणक वापरणे समाविष्ट आहे, उदाहरणार्थ, लोक टेलिव्हिजन पाहतांना काही शारीरिक हालचाली होतात, अभ्यासात असे आढळून आले आहे की, झोपेच्या वेळी रील पाहणे आपल्या मानसिक आणि "शारीरिक प्रकृती साठी" हानिकारक ठरू शकते. खरं तर, बहुतेक लोक झोपायच्या वेळी व्हिडिओ पाहतात.आपण यापासून जितके दूर राहू तितके आपले शरीर निरोगी राहील.
 
सवयी सुधारण्याची गरज
हेबेई मेडिकल Reel addiction युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शिफारस केली आहे की, निरोगी जीवनशैली जगण्यासोबतच, उच्च रक्तदाब रोखण्यासाठी लोकांनी झोपेच्या वेळी व्हिडिओ पाहू नये. संशोधकांच्या मते, रील पाहण्याऐवजी, पुस्तक वाचा, व्यायाम करा किंवा मित्रांना भेटा. झोपण्यापूर्वी फोन वापरणे बंद करा.यामुळे, तुमचे आरोग्य तर चांगले राहीलच सोबतच वेळही वाचेल.