पहिल्याच दिवशी काँग्रेसचे नवे मुख्यालय वादात

15 Jan 2025 21:51:26
- इंदिरा भवन नको, मनमोहनसिंग यांचे नाव देण्याची मागणी

नवी दिल्ली, 
Congress's new headquarters : काँग्रेसचा पत्ता आजपासून बदलला असून, २४ अकबर रोड ऐवजी, ९ ए, कोटला मार्ग असा झाला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी काँग्रेस मुख्यालय वादाच्या भोवर्‍यात सापडले. काँग्रेसने आपल्या नवीन मुख्यालयाचे नाव इंदिरा भवन ठेवले असताना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डॉ. मनमोहनसिंग भवन नाव देण्याची मागणी केली. तसे होर्डिगही या मुख्यालयाच्या बाहेर लावण्यात आले होते.
 
 
Congress's new headquarters
 
इंदिरा भवन या काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन आज काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महासचिव प्रियांका वढेरा आणि काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री देशभरातील काँग्रेसचे निमंत्रित नेते उपस्थित होते. दीनदयाल उपाध्याय मार्गावर भाजपाचे मुख्यालय असून, या मुख्यालयाजवळच काँग्रेसचे नवे मुख्यालय आहे. मात्र, काँग्रेसने जाणिवपूर्वक नव्या मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार दीनदयाल उपाध्याय मार्गावर न ठेवता पाठीमागे ठेवल्यामुळे त्याचा पत्ता ९ ए, कोटला मार्ग असा झाला. अत्याधुनिक अशा या मुख्यालयाचे उद्घाटन झाले असले, तरी तेथे प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार असल्याचे समजते.
 
 
Congress's new headquarters : संपुआ शासनकाळात २००९ मध्ये म्हणजे डॉ. मनमोहनसिग पंतपधान असताना सोनिया गांधी यांच्या हस्ते या मुख्यालयाचे भूमिपूजन झाले होते. २४२ कोटी रुपये यासाठी खर्च झाले. २० दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे नाव या मुख्यालयाला देणे औचित्यपूर्ण ठरले असते.
Powered By Sangraha 9.0