नाईन स्टार, जिल्हा कोचिंग नागपूरची आगेकुच

15 Jan 2025 21:01:59
- खासदार क्रीडा महोत्सव स्पर्धा
 
नागपूर, 
Khasdar Krida Mahotsav : खासदार क्रीडा महोत्सवातील सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये अमरावतीच्या नाईन स्टार अमरावती आणि जिल्हा कोचिंग सेंटर (डीसीसी) नागपूर संघाने महिला आणि पुरुष गटात विजयी घोडदौड कायम ठेवली विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे ही स्पर्धा सुरू आहे.
 
 
Softball dksl
 
बुधवार, १५ जानेवारी रोजी झालेल्या सामन्यात महिला गटात डीसीसी नागपूर संघाला नाईन स्टार, अमरावती संघाने १२-० नमवून स्पर्धेत आगेकूच केली. अन्य सामन्यात नागपूरच्या जिल्हा कोचिंग सेंटरने गोंदियाच्या जीके कॉलेज संघाचा १२-० ने पराभव केला. सीनिअर पुरुष गटात नागपूरच्या जिल्हा कोचिंग यवतमाळ संघाचा १-० ने पराभव करून विजय मिळविला.
 
 
 
राज्य ज्युनिअर व यूथ व्हॉलिबॉल स्पर्धा आजपासून
Khasdar Krida Mahotsav : खासदार क्रीडा महोत्सव अंतगरत राज्य ज्युनिअर व यूथ व्हॉलिबॉल स्पर्धा गुरुवार, १६ ते १९ जानेवारीदरम्यान प्रतापनगरातील समर्थ व्यायाम शाळेच्या प्रांगणात होत आहे. उद्घाटनला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज़्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे विजय डांगरे, सरचिटणीस संजय नाईक, राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य नीलेश जगताप तसेच असोसिएशनचे रेफरी बोर्ड अध्यक्ष पी.एस. पंत उपस्थित राहतील. राज्यातील ८ झोनमधील एकूण ३२ संघ भाग घेत असून एकृूण ४५० खेळाडू भाग घेतील. चार गटांमध्ये ही स्पर्धा विभागली असून खेळाडूंची राहण्यासाठी सोय आमदार निवास येथे करण्यात आली आहे. एकूण ६४ सामने खेळल्या जातील. स्पर्धेच्या समितीमध्ये संयोजक आ.संदीप जोशी, सचिव पीयूष अंबुलकर, सहसंयोजक विशाल लोखंडे, आयोजन सचिव सुनील हांडे हे आहेत.
Powered By Sangraha 9.0