मार्क झुकरबर्गच्या पोस्टबद्दल मेटाने भारताची मागितली माफी!

15 Jan 2025 14:53:23
नवी दिल्ली,
Mark Zuckerberg Apology : मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडील पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की 2024 हे वर्ष जगासाठी अशांततेने भरलेले होते आणि कोविडनंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांच्या सरकारांचा पराभव झाला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कारण हा दावा तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा होता.
 हेही वाचा : म्हणून मी आधी तिथे गेलो आणि स्नान केले ...असे गेले महात्मा गांधी कुंभमेळ्यात !
 
meta
 
 
 
या मुद्द्यावर, मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी मार्क झुकरबर्ग यांनी दिलेल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी ट्विट केले की भारत हा मेटासाठी एक अविश्वसनीय महत्त्वाचा देश आहे. या अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागू इच्छितो. हेही वाचा : कुंभ, हज आणि व्हॅटिकन मास...नेमका फरक काय?
निशिकांत दुबे यांचा प्रतिसाद
 
 
 
 
आयटी संसदीय समितीचे प्रमुख भाजप खासदार निशिकांत दुबे. त्यांनी मेटा इंडियाच्या माफीला भारतातील सामान्य नागरिकांचा विजय असल्याचे वर्णन केले. त्यांनी सांगितले की, ही माफी म्हणजे भारतीय संसद आणि सरकारवरील जनतेच्या विश्वासाची पुष्टी आहे. दुबे पुढे म्हणाले की, भविष्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना इतर बाबींवरही समन्स बजावले जाईल.
 
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रतिक्रिया
 
 
 
 
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मार्क झुकरबर्ग यांच्या वक्तव्याला चुकीचे म्हटले आणि म्हटले की, भारतातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर विश्वास दाखवला आहे. वैष्णव यांनी झुकरबर्गचा दावा चुकीचा असल्याचे तथ्य मांडले आणि भारतातील नागरिकांनी महामारीनंतरही सध्याच्या सरकारवर विश्वास कायम ठेवला.
Powered By Sangraha 9.0