कारंजा लाड,
National Karate Competition : राजस्थानातील अलवार येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल कराटे स्पर्धेत कारंजातील विद्यार्थ्यांनी कराटे मास्टर सुधाकर दमगीर पाटील यांच्या मार्गदर्शनात सहभाग घेतला. या राष्ट्रीय कराटे स्पर्धा टी एस शोतोकॉन कराटे जे इंडिया व मार्शल आर्ट अकॅडमी चे आयोजक सोमवीरसिंग तवर व टीकाराम यादव यांनी आयोजित केल्या होत्या. या नॅशनल कराटे स्पर्धा वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या नियमानुसार खेळल्या यात १४, १७ व १९ वर्षाखालील २२ राज्यातील ८०० खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत कारंजातील १४ वर्षाखालील मुला मुलींमध्ये जिया सुर्वे , रोहिणी सावते, वसुंधरा कुंभार, पूर्वा जोशी , समृद्धी महेंद्र खंडारे, आरोही अंगाईतकर, प्रज्ञा आठवले आणि मनस्वी डांगे सुवर्ण रजत व कास्य पदक पटकावले तर मुलांमध्ये सचिन एकनार, सर्वज्ञ नाथुलकर, कृष्णा खाटले, वेदांत कानडे, कुशल कागे व रुद्र आवारे यांनी सुद्धा सुवर्ण रजत व कांस्यपदकाची कमाई केली. १७ वर्षाखालील मुला मुलींमध्ये मानसी कुटे, शुभांगी शिंपी, संकेत वाघमारे, पुष्पक लोखंडे, सार्थक राऊत व योगेश आंबेकर यांनी पदकांची कमाई केली. National Karate Competition १९ वर्षाखाली मुला मुलीमध्ये धनश्री मारकड, मयुरी चव्हाण, अनुष्का बोचरे, पलक गजभिये व तेजस डीमरेकर यांनी पदक पटकावले. कारंजातील कराटे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने स्पर्धेहून परतल्यानंतर त्यांचे फटायांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. या स्पर्धेत कारंजातील कराटेपटूंनी १० गोल्ड, १५ सिल्वर व १६ ब्रांझ मेडलची कमाई केली. विद्यार्थ्यांच्या यशासाठी त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव केला जात असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.