समृद्धी महामार्गावर आणखी एका ट्रॅव्हल्सचा भयावह अपघात; एक ठार, २७ जखमी!

15 Jan 2025 20:09:24
पुलगाव,
Samruddhi Highway accident : येथून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक ९० जवळ ट्रॅव्हल्सने ट्रकला धडक दिल्याने ट्रॅव्हल्सचा चालक ठार झाला असून ट्रॅव्हल्स मधील २७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज १५ जानेवारी रोजी सकाळी झाला.
 

accident 
 
 
पुण्यावरून नागपूरकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी 45 झेड एफ ओ 8849 या ट्रॅव्हल्सने समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या ट्रकला धडक दिली. यात ट्रॅव्हल्स चालक संतोष परियार याचा जागेवरच मृत्यू झाला. सदर ट्रॅव्हल्सला दोन चालक होते. पुण्यावरून महेश बिष्ट या चालकाने ट्रॅव्हल्स आणली होती. अपघाताच्या वेळी संतोष परीयार हा वाहन चालवत होता. अपघातामध्ये 27 जण जखमी झाले आहे. प्रतीक धडे ( 29) नागपूर, यामीन भरणे (25) नागपूर, प्रवीण जाधव (52) नागपूर, महेश बिष्ट (38) पुणे, अवंती वितोडे (25) वर्धा, हे पुलगाव ग्रामीण रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहे. मृतक चालक संतोष राम परियार लातूर येथील रहिवासी आहे.
Powered By Sangraha 9.0