खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा

15 Jan 2025 19:01:53
नागपूर,
khasdar krida mahotsva 2025 खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुष गटात मराठा लॉन्सर्स काटोल, धरमपेठ, वानाडोंगरी, महाल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मानकापूर इनडोअर स्टेडियममध्ये बुधवारी उप उपांत्यपूर्व फेरीतील सामने झाले.
 
 
  
kabbadi
 
 
 
पुरुष गटातील khasdar krida mahotsva 2025 अन्य सामन्यांत प्रतिस्पर्धींना पराभूत करून ओम क्रीडा मंडळ, नागपूर, विक्रांत स्पोर्टिंग क्लब, नागपूर, सावित्रीबाई फुले, नागपूर, गोंडवाना स्पोर्टिंग क्लब, सडक अर्जुनी, तरुण सुभाष, सोनेगाव बोरी, शक्ती जीम, उमरेड आणि साई स्पोर्टिंग, काटोल या संघांनी देखील उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला.
 
 
मराठा khasdar krida mahotsva 2025 लॉन्सर्स, काटोल केशरी क्रीडा मंडळ, कळमेश्वर (२६-०६) संघाला, मराठा लॉन्सर्स धरमपेठ नागपूर संघाने शिव गर्जना रामटेक (४२-२८) संघाला, मराठा लॉन्सर्स वानाडोंगरी संघाने मातृभूमी क्रीडा मंडळ, उमरेड (४०-२९) संघाला आणि मराठा लॉन्सर्स महाल संघाने सुवर्ण भारत क्रीडा मंडळ, खापरखेडा (३७-११) संघाला मात देउन आगेकूच केली.महिलांच्या स्पर्धेत गजानन मंडळ, चक्रधर नगर (नागपूर) केशरी क्रीडा मंडळ कळमेश्वर (३७-२०) संघाचा, जय सेवालाल देवठाणा संघाने विद्यार्थी युवक, जुना सुभेदार (नागपूर) (३०-०७) संघाचा, रवींद्र क्रीडा मंडळ, उमरेड संघाने विक्रांत स्पोर्टिंग क्लब नागपूर (४०-३०) संघाचा आणि सिटी पोलिस नागपूर संघाने मराठा लॉन्सर्स वानाडोंगरी (४५-१७) संघाचा पराभव करुन उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
Powered By Sangraha 9.0