चिटणवीस सेंटर येथे वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी

    दिनांक :16-Jan-2025
Total Views |
नागपूर,
Elocution Competition Chitnavis Centerचिटणवीस सेंटरने स्वामी विवेकानंद यांच्या जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन केले.या स्पर्धेचा विषय शहर उत्तम बनविण्यात नागपूरचा युवा काय भूमिका बजावू शकतो.आणि उत्तम वाहतूक, व्यवस्थापन, उत्तम स्वच्छता आणि उत्तम हिरवळ.
 
 
monday  
 
 
प्रारंभिक फेरी १६ जानेवारीला आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीसाठी १६ ते २५ वयोगटातील ५६ सहभागी उपस्थित होते, त्यापैकी १५ सहभागी अंतिम फेरीसाठी निवडले गेले आहेत.Elocution Competition Chitnavis Center या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक कल्पना पांडे, धारिणी सेलारका, प्रा.आनंद सहस्रबुद्धे, प्रा. राज पशीने, जावेद राणा, अ‍ॅड. ज्ञानेश काळे आणि अ‍ॅड.अल्ताफ होते. स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवार, १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणारअसून, ७ वाजता बक्षीस वितरण समारंभ सुरू होईल. सर्वांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा.आयोजकांनी सर्व नागपूरकरांना नागपूरच्या तरुण प्रतिभांच्या पारितोषिक विजेत्या भाषणांचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
सौजन्य:योगिता चकोले,संपर्क मित्र