आहार कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

16 Jan 2025 19:07:51
वाशीम,
Prime Minister's Nutritional Power Generation Scheme प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्ह्यातील ११०४ शाळामधील २२१७ पोषण आहार कर्मचार्‍यांना तीन महिन्यापासून मानधन न मिळाल्याने पोषण आहार कर्मचार्‍यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत राज्यासह जिल्ह्यात पोषण आहारास पात्र असलेल्या जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी अनुदानीत शाळामध्ये शालेय पोषण आहार शिजविणार्‍या स्वयंपाकी तथा मदतनीस यांना दरमहा २५०० रुपये एवढे मानधन देण्यात येते. वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात २१२ शाळा ३३२ कर्मचारी, मंगरुळनाथ तालुक्यातील १६४ शाळा ३१६ कर्मचारी, मानोरा तालुक्यातील १७५ शाळा ३३८ कर्मचारी, रिसोड तालुक्यातील १७२ शाळा ३७३ कर्मचारी, वाशीम तालुक्यातील २२७ शाळा ५१७ कर्मचारी, मालेगाव तालुक्यातील १६४ शाळा ३४१ कर्मचारी असे जिल्ह्यातील ११०४ शाळामध्ये २२१७ पोषण आहार कर्मचार्‍याचे दरमहा २५०० प्रमाणे तीन महिन्याचे मानधन अद्यापही मिळालेले नाही.
 
 
pm nutrition yojana
 
 
Prime Minister's Nutritional Power Generation Scheme शालेय विद्यार्थ्यांना दररोज आहार देणार्‍या पोषण आहार कर्मचार्‍यांना दिवसाला ८३ रुपये एवढा रोजगार मिळतो. त्याचवेळेस मनरेगावर काम करणार्‍या कर्मचार्‍याला २९७ रुपये एवढी मजुरी मिळते. सकाळी ९ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत आहार शिजविणे आणि वाटप करणे एवढे काम करुनही फक्त ८३ रुपये तेव्हा किमान नरेगावर काम करणार्‍या कर्मचार्‍याएवढे तरी आम्हाला मानधन मिळावे, असे मत पोषण आहार कर्मचार्‍यांनी व्यक्त केले.
 
Powered By Sangraha 9.0