नागपूर,
Ramnagar Nagpur कुंडली शृंगेरी महासंस्थांनाचे श्री श्रीअभिनव स्वामी यांनी ७२ वे शंकराचार्य म्हणून नियुक्ती झाल्यावर, नवनियुक्त शंकराचार्य यांची विजय यात्रा काढण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार स्वामीजींचे नागपूर नगरीत आगमन झाले आहे.रामनगर येथील राम मंदिरात विधिविधानपूर्वक वैदिक मंत्र घोषात स्वागत करण्यात आले.शंतनू व प्रभाकर गुरुजी यांनी मंत्रपठण केले.
अध्यक्ष रवी वाघमारे यांनी स्वामीजींचे स्वागत केले.Ramnagar Nagpur याप्रसंगी वृषाली शिलेदार, श्रीराम सावरकर, अशोक आग्रे,दत्तात्रय खरे,प्रकाश तपस्वी, नारायण निघोट, आनंद नाशिककर आदी अनेक भक्त उपस्थित होते.स्वामीजींनी सर्वांना शुभाशिर्वाद प्रदान केले.यावेळी विविध संस्थांमध्ये त्यांची प्रवचने व इतर कार्यक्रम आहेत.
सौजन्य: रवि वाघमारे,संपर्क मित्र