सिद्धी विनायक मंदिरात उद्यापासुन यात्रा महोत्सव

    दिनांक :16-Jan-2025
Total Views |
केळझर,
Siddhi Vinayaka Temple Yatra : येथील टेकडीवरील ऐतिहासिक श्री. सिद्धी विनायक गणपती मंदिरात 17 व 18 रोजी पौष संकष्टी चतुर्थीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 4 वाजता शशिकांत ईरुटकर यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक होईल.
 
 
keljhar
 
रोज सकाळ, सायंकाळ महाआरती, गणपती अथर्वशीर्ष पठन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम होतील. शनिवार 18 रोजी भजन स्पर्धेचे आयोजन केले असून सकाळी 10 वाजता राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. प्रमुख अतिथी म्हणून निलेश गावंडे, गुंड्डू कावळे, अशोक कलोडे उपस्थित राहतील. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली आहे. भाविक भक्तांनी यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष माधव ईरुटकर, सचिव महादेव कापसे आदींनी केले आहे