शैलेश भोयर
नागपूर,
Vidarbha-Flax productivity : जवस हे पारंपरिक पीक आहे. परंतु कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले सुधारित तंत्रज्ञान शेतकरी वापरत नाहीत. योग्य भाव मिळत नसल्याने विदर्भात जवसाच्या लागवडीचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे उत्पादनही कमीच असते. जवस पिकाला पुनरुज्जीवित करण्यासाठी येथील संशोधक विविध उपाययोजना करीत आहेत. ग्रामीण भागात जाऊन प्रात्यक्षिक दाखविण्यासह जनजागृती करतात. लावगडीसाठी प्रोत्साहित करतात. जवसाला चांगली मागणी असल्याने जवस पेरा हळूहळू वाढू लागला आहे. परिणामी विदर्भात जवसाच्या उत्पादकतेत 15.7 टक्के वाढ झाली असून, लागवडीचे क्षेत्र 22 टक्क्यांनी वाढले आहे.
जवस हे खाद्यतेल आणि महत्त्वाचे फायबरयुक्त पीक आहे. पन्नास वर्षांपूर्वी सर्वत्र जवसाचा पेरा होता. खाद्यतेलामध्ये जवसच प्रचलित होते. घराघरांत केवळ जवस तेलाचाच वापर व्हायचा. स्पर्धेच्या युगात जवस मागे पडत गेले. उत्पादनही कमी होत गेले. परिणामी जवस तेल खाणाèयांची संख्या बोटावर मोजण्याइतपत उरली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अ. भा. समन्वित जवस संशोधन केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त वतीने जवस पुनरुज्जीवित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. येथील केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बिना नायर आणि त्यांची चमू विदर्भातील गावागावांत जाऊन जवस लागवडीसाठी प्रात्यक्षिक दाखवितात. चमूच्या प्रयत्नांमुळे जवस पेरणीला प्रोत्साहन मिळाले.
वर्षभरात जवळपास पाचशे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. हा उपक्रम निरंतर राबविला जात असल्याने विदर्भात जवस पिकाचे लागवड क्षेत्र आणि उत्पादकता वाढली. विदर्भात 2021-22 या वर्षात 264.2 केजी पर हेक्टर उत्पादकता होती. 2023-24 या वर्षात 457.70 एवढी उत्पादकता झाली आहे. उत्पादकेत 15.7 टक्के वाढ झाली असून लागवडीचे क्षेत्र 22 टक्क्यांनी वाढले आहे.
चंद्रपूर, गोंदियात सर्वाधिक पेरा
पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे जवसाचे पीक घेतले जाते. सर्वाधिक चंद्रपुरात 2806.50 हेक्टर उत्पादन घेतले जाते. त्या खालोखाल गडचिरोलीत, तर सर्वात कमी नागपुरात आहे. यासोबतच पश्चिम विदर्भात सर्वाधिक जवसाची लागवड केली जाते. देशाचा विचार केल्यास मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आदी राज्यांत सर्वाधिक पीक घेतले जाते.
जवसाला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रात्यक्षिके
जवसाला पुनरुज्जीवित करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम विदर्भात शेतकरी गटांमार्फत शेतकèयांना 500 प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. जवस पिकाची लागवड, त्यावरील रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणी, बियाणे कोणते वापरायचे, लागवड कशी करायची यासंदर्भात प्रशिक्षण दिल्यानंतर कीड आणि रोगांवर फवारणीसाठी औषधे दिली जातात. याशिवाय शेतकèयांच्या बांध्यावर शेती दिनानिमित्त चांगले उत्पादन घेणाèया शेतकèयांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले जाते. परिणामी विदर्भात जवसाची उत्पादकता आणि लागवडीचे क्षेत्र वाढले.
डॉ. बिना नायर, प्रमुख शास्त्रज्ञ