नागपूर,
Ravindra Kumar Singal : खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे प्रतापनगर मैदानात नागपूर पोलिस डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते थाटात शुभारंभ झाला.
याप्रसंगी पोलिस उपायुक्त लोहित मतानी, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, महाराष्ट्र व्हॉलिबॉल फेडरेशनचे अजित पाटील, विजय डांगरे, सुनील हांडे, आयोजन समितीचे विशाल नीरज दोंतुलवार, नितीन महाजन आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी राज्यभरातून आलेल्या खेळाडूंना केले.स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले.