मुंबई,
व्हीआयपींवरीलsharad pawar हल्ल्यामुळे पुन्हा एकदा sharad pawar मुंबई हादरली. आधी सलमान खानच्या वांद्रेतील घरावर गोळीबार. नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या . आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अधिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला करण्यात आला.अभिनेत्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलिसांकडून चाहत्यांना शांतता ठेवण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. याप्रकरणी आता विरोधांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.
त्यांनी याकडे गांभीर्याने पाहावं
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार sharad pawar गटाचे प्रमुख शरद पवार यांनी या घटनेवर तिखट प्रतिक्रिया दिली.कायदा सुव्यवस्था किती ढासाळतेय हे लक्षात येतंय. याच भागात एकाची हत्या झालीय, हा हत्येचा दुसरा प्रयत्न आहे. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहे. राज्य सराकरने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्री आहेत, त्यांनी याकडे गांभीर्याने पाहावं”, अशी विनंती शरद पवारांनी केली. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सदर प्रकरणावर भाष्य करत सत्ताधारांवर निशाणा साधला आहे.घटनेची माहिती मिळताच त्यांनी पहिले सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी करीना कपूरची बहीण करिष्मा कपूरला फोन करत माहिती घेतली. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘ही दुर्दैवी घटना असून महाराष्ट्रात आणि मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत,’ अशा शब्दात त्यांनी टीका केली.
हल्ल्याला धार्मिक रंग?
या हल्ल्याला sharad pawar धार्मिक रंग तर नाही ना? अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने वार करण्यात आले ते पाहता, यामागे धार्मिक कट्टरता असलेला व्यक्ती तर नाही ना? अशी शंका आव्हाड यांनी व्यक्त केली. त्यांनी एकूणच या सर्व प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो. अशाप्रकारची उघड-उघड दहशत पाहण्यासाठी मुंबई सरावलेली नाही, असे आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.