दिल्ली पोलिस नियंत्रणात आणण्याचा होता प्रयत्न

17 Jan 2025 19:57:06
नवी दिल्ली, 
Kejriwal Andolan : एक मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांसह धरण्यावर बसण्याची घटना अभूतपूर्व अशी होती. याआधी देशात अशी घटना कधी घडली नव्हती. या घटनेमुळे तेव्हा प्रचंड खळबळ उडाली होती. रेलभवनाला लागून असलेल्या संसदभवनासमोर केजरीवाल धरण्यावर बसणार असल्यामुळे पोलिसांनी १४४ कलम लागू केले होते. त्याचे उल्लंघन करीत धरण्यावर बसल्यामुळे पोलिसांनी केजरीवाल आणि आपच्या नेत्यांविरुद्ध कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्रही दाखल केले. पोलिसांना केजरीवाल आणि आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी थंड पाण्याचा मारा आणि लाठीहल्ला करावा लागला.
 
 
Kejriwal Andolan
 
Kejriwal Andolan : शेवटी या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची तसेच दोन पोलिस अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा करीत तत्कालीन नायब राज्यपाल नजीन जंग यांनी केजरीवाल यांना धरणे आंदोलन आवाहन केले आणि हा काही दिवस सुरू असलेला राजकीय तमाशा संपवण्यात आला. सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा हे केवळ निमित्त होते. केजरीवाल यांना दिल्ली पोलिस आपल्या नियंत्रणाखाली आणायचे होते. त्यासाठी केजरीवाल यांनी हे शक्तिप्रदर्शन करीत केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असे मानले जात होते. कारण, दिल्ली पोलिस सरकारच्या नियंत्रणात आहे. त्यामुळेच पोलिस अधिकार्‍यावर कारवाई करावी, या मागणीसाठी केजरीवाल यांना धरण्यावर बसावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांच्या आपचे वर्णन दिल्लीवर दहा वर्षापूर्वी आलेली आपची आपदा या शब्दांत जे केले, ते यथार्थ असे होते. ही आपदा आणखी किती वर्षे सहन करायची, याचा निर्णय दिल्लीच्या मतदारांना आता आहे.
Powered By Sangraha 9.0