तर, छायांकित प्रतीच्या आधारे दस्ताची मुद्रांक शुल्क निश्चिती करू!

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

    दिनांक :17-Jan-2025
Total Views |
मुंबई,
Revenue Minister C. Bawankule सोसायटी आणि विकासक यांच्यातील वादामध्ये समजुतीच्या करारनाम्याचा (Memorandum of Understanding) दस्त सात दिवसांत तक्रारीसोबत सहजिल्हा निबंधक वर्ग - १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे प्राप्त न झाल्यास, उपलब्ध छायांकित प्रतीच्या सत्यतेबाबत विकासकास काही म्हणायचे नाही. असे समजून छायांकित प्रतीच्या आधारे दस्ताची मुद्रांक शुल्क निश्चिती व आवश्यकतेनुसार वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
 
 
bawankule
 
 
 
पुण्यातील येरवडा Revenue Minister C. Bawankule परिसरातील कल्याणीनगरमधील प्रिन्सटन टाऊन को-ऑप हौसिंग सोसायटीसंदर्भात अर्जदार सतीश सुराणा यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग - १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुराणा यांनी Revenue Minister C. Bawankule केलेल्या तक्रारीची दखल घेऊन समजुतीचा करारनामामधील पक्षकार (सोसायटी व निष्पादक) यांना तक्रारीतील समजुतीचा करारनामाचे निष्पादन व त्यास मुद्रांक शुल्क न भरण्याविषयी खुलासा सादर करण्यास नोटिशीद्वारे कळविण्यात आले होते. परंतु, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने मंगेश खामकर, सह जिल्हा निबंधक वर्ग-२ तथा प्रशासकीय अधिकारी, पुणे शहर यांना बांधकाम व्यावसायिक यांच्या कार्यालयास समक्ष भेट देऊन मूळ समजुतीचा करारनामा ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे व तो सह जिल्हा निबंधक वर्ग - १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे, अशीही माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली.