साप्ताहिक राशिभविष्य
मेष (Aries Zodiac): कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण
Weekly Horoscope : या राशीच्या मंडळींना या आठवड्यात नोकरी-व्यवसायात काही महत्त्वपूर्ण घटना घडण्याचे योग आहेत. राशिस्वामी मंगळ सुखस्थानातून कर्मस्थानाला पाहात आहे. तो लवकरच वक्रगतीने पराक्रम स्थानात येणार आहे. त्याची भाग्यस्थानावर दृष्टी येईल. चंद्रही याच आठवड्यात सहाव्या कर्म स्थानातून भ्रमण सुरू करणार असल्याने हे योग लाभावेत. या काळात काही आर्थिक लाभ निश्चित होईल. सरकारी नोकरीत असणार्यांना हा आठवडा चांगला जावा. अनपेक्षित बढती, व्यवसायात वाढ, आर्थिक आवक वाढण्याचे योग आहेत. बेरोजगारांचे नोकरी-व्यवसायाबाबतचे प्रश्न सुटू शकतील.
शुभ दिनांक - १९, २०, २१, २५.
वृषभ (Taurus Zodiac): आरामप्रेमी, चंगळवादी सप्ताह
या आठवड्यात आपण काहीसे आरामप्रेमी, चंगळवादी व घडतेय ते होऊ द्या या स्वभावाचे बनण्याची शक्यता आहे. राशिस्वामी सध्या योगकारक शनीसोबत दशम कर्मस्थानात आहे. चंद्र पंचम या शुभ स्थानातून भ्रमण सुरू करणार आहे. हे दोन्ही योग सुखदायक असल्याने प्रयत्नाने काही मिळविले पाहिजे, हा विचार मागे पडून आराम, चंगळवाद वाढू शकतो. मोठ्या उत्साहात खर्च करायला लावणाराही हा सप्ताह आहे. नंतर पश्चाताप करायला लावणारा हा काळ दिसतो. आठवड्याच्या शेवटी जोडीदारालाही काही उत्तम योग लाभतील. त्याचा उत्कर्ष होऊ शकेल.
शुभ दिनांक - २१, २२, २४, २५.
मिथुन (Gemini Zodiac): व्यग्रता वाढण्याची शक्यता
Weekly Horoscope : हा आठवडा या राशीच्या मंडळींना काहीसा धावपळीचा व भरपूर व्यग्रतेचा जाणार आहे असे दिसते. आपला राशिस्वामी बुध आठवड्याच्या सुरुवातीलाच अष्टम या पीडादायक स्थानात रवीच्या सान्निध्याने अस्तंगत होत आहे. त्यामुळे प्रमाणात आर्थिक ओढाताण जाणवण्याची शक्यता आहे. एखादा मोठा खर्च अचानक उद्भवून आर्थिक फटका बसू शकतो. तो नोकरी करणार्यांची जबाबदारी वाढवून दगदग, चिंता, तणाव वाढवू शकतो. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदाराशी मतभेद निर्माण होऊ शकतात. राशीत येणार्या मंगळामुळे किरकोळ अपघाताचे भय राहील.
शुभ दिनांक - १९, २०, २२,
कर्क (Cancer Zodiac): जोडीदाराला सुखदायी योग
आपला राशिस्वामी चंद्र या सप्ताहाच्या सुरुवातीला सप्तम या जोडीदाराच्या स्थानातून भ्रमण सुरू करणार आहे तसेच आपल्या राशीत बराच काळ मुक्काम करून असलेला नीचीचा मंगळ याच सप्ताहात वक्रगतीने व्ययात जाईल. या प्रभावाने हा सप्ताह जोडीदाराकडून सुखदायी योगांची पखरण करतानाच आपणास काहीसा ताण, दगदग व काहीसा त्रासदायक शकतो. या आठवड्याच्या मध्यात काहीशी खर्चवाढ संभव आहे. दुसरीकडे आपल्या जोडीदाराला तो उत्कर्षकारक ठरणार आहे. काहींना उत्तम संतती योगदेखील तो निर्माण करू शकेल. जोडीदाराची मते पटवून घ्यावी लागतील. खटके उडणार असतील तर वेळीच माघार घ्या.
शुभ दिनांक - २०, २२, २३, २४.
सिंह (Leo Zodiac): संमिश्र स्वरूपाचे वातावरण
Weekly Horoscope : या आठवड्यात या राशीच्या मंडळींच्या घरात, कर्मस्थानात किंवा व्यवसायात काहीसे कलहाचे, संघर्षाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. राशिस्वामी रवी या सप्ताहात षष्ठ या शत्रुपीडेच्या स्थानात आहे व त्यावर सुरुवातीला नीच राशीच्या मंगळाची दृष्टी येत आहे. त्यामुळे या काळात विरोधकांचा उपद्रव, कमालीची स्पर्धा, हाताखालच्या सहकार्यांपासून मनस्ताप असे वातावरण निर्माण होऊ शकते. काहीना प्रवास, भ्रमंतीची मिळणार असली तरी त्यात दगदग, त्रास सहन करावा लागू शकतो. काही युवकांना नोकरी-व्यवसायाचे योग यावेत. असे या सप्ताहात संमिश्र स्वरूपाचे वातावरण आपल्याभोवती राहील.
शुभ दिनांक - २०, २१, २३, २५.
कन्या (Virgo Zodiac): बेसावध राहू नये
राशिस्वामी बुध या सप्ताहाच्या सुरुवातीला सुख स्थानात विराजमान आहे आणि चंद्र आपल्याच राशीतून या सप्ताहाचे सुरू करणार आहे. ही ग्रहस्थिती आपणासाठी अतिशय उत्तम असून उत्तम धनलाभ, सुख आणि समाधानाची स्थिती व आनंददायी घटनांसाठी पोषक आहे. पंचम या शुभ स्थानातील रवी उत्साहवर्धक आहे. मात्र या सार्यात बेसावध राहून चालणार नाही. कारण शत्रुस्थानातील शनीच्या प्रभावामुळे आपले काही व्यवहार वादाच्या भोवर्यात व संशयाच्या जाळ्यात सापडू शकतात. त्यामुळे सावधगिरीचे, सतर्कतेचे धोरण बाळगावयास हवे.
शुभ दिनांक - २२, २३, २४, २५.
तूळ (Libra Zodiac): अतिशय उत्तम, सुखद योग
Weekly Horoscope : या सप्ताहात तूळ राशीच्या मंडळींना घरात तसेच त्यांच्या कर्मस्थानात अतिशय उत्तम व सुखद वातावरण लाभण्याचे योग आहेत. आपला राशिस्वामी शुक्र या सप्ताहाच्या सुरुवातीला योगकारक शनीसोबत पंचम या शुभ स्थानी विराजमान आहे. त्यामुळे काही आलबेल असणार आहे, हे मात्र खरे. दरम्यान, दशम स्थानातील नीच राशीचा मंगळ सप्ताहाच्या मध्यात काही विचित्र अनुभव देऊन काहीसा उद्विग्न करू शकतो, पण त्याचा प्रभाव अल्पच असेल. कौटुंबिक सुखात वाढ व्हावी. जोडीदाराचे उत्तम व सुखद सहकार्य लाभेल. मुलांच्या प्रगतीच्या वार्ता कळतील. सप्ताहाच्या शेवची काहींना अल्पशी आर्थिक कोंडी अनुभवावी शकते.
शुभ दिनांक - २०, २१, २२, २४.
वृश्चिक (Scorpio Zodiac): कार्यक्षेत्रात उत्साहाचे वातावरण
आपला राशिस्वामी मंगळ सध्या भाग्य स्थानात असला तरी तो स्वतःच्या नीच राशीत काहीसा कमकुवत आहे. दुसरीकडे चंद्राचे भ्रमण आपल्या लाभस्थानातून सुरू होऊन सप्ताहाच्या अखेरच्या काही दिवसात तो आपल्याच राशीत राहील. त्यामुळे चंद्राचे उत्तम बळ प्राप्त होणार आहे. सुखद स्थितीमुळे नोकरी-व्यवसायात सलोख्याचे व उत्साहाचे वातावरण राहील. कुटुंबातून, मित्रमंडळींकडून आपणास अपेक्षित सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस होणार्या बुधाच्या राश्यंतरानंतर या स्थितीत अधिकच भर पडेल. काहींना नोकरीच्या कामामुळे घराबाहेर जावे लागू शकते.
शुभ दिनांक - २२, २३, २४, २५.
धनु (Sagittarius Zodiac): उत्तम सुरुवात, शेवट रेंगाळणार
Weekly Horoscope : राशिस्वामी गुरू सध्या सहाव्या कर्म असल्यामुळे तो सध्या आपल्या कार्यक्षेत्रात आनंदवर्धक व यशदायक ठरला आहे. याचवेळी चंद्र आपल्या दशम कर्मस्थानातून भ्रमण सुरू करीत व्यय स्थानापर्यंत प्रवास करणार आहे. यामुळे आठवड्याची सुरुवात अतिशय उत्तम व यशदायी असेल; मात्र सप्ताहाचा उत्तरार्ध काहीचा खर्चिक, पैशाची कमतरता व आरोग्याची काहीशी कुरबूर निर्माण करणारा ठरू शकतो. या संमिश्र वातावरणात काही कामे रेंगाळतील. आळस, अनिच्छा निर्माण होऊ शकते, आरोग्याच्या काही छुप्या कारणांनी बेजार होऊ शकता. दुसरीकडे कुटुंबीयांकडे लक्ष द्यायला वेळ काढावा लागेल.
शुभ दिनांक - १९, २०, २२, २४.
मकर (Capricorn Zodiac): पुढे जाण्याचे बळ मिळेल
राशिस्वामी शनी धनस्थानात आहे तर रवी आपल्या राशीत विराजमान आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला भाग्येश बुध राशीत येणार आहे. राशिस्वामी सोबतच असलेला योगकारक शुक्र आपल्याला सर्व कार्यात, आपल्या क्षेत्रात हिरीरीने पुढे जाण्याचे बळ देत आहे. आर्थिक आवक या सप्ताहात उत्तम असणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी-व्यवसायातील रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. आपला दबदबा निर्माण होण्यास मदत होईल. कुटुंबातील, समाजातील दर्जा उंचावेल. आठवड्याच्या शेवटी मात्र काहींना मानसिक अस्वास्थ्य निर्माण होऊ शकते.
शुभ दिनांक - २०, २१, २३, २५.
कुंभ (Aquarius Zodiac): खर्चाला वाटा फुटणार
Weekly Horoscope : या सप्ताहाच्या सुरुवातीला राशिस्वामी शनी योगकारक शुक्रासोबत आपल्या राशीतच आहे तर चंद्र अष्टम या पीडादायक स्थानातून भ्रमण सुरू करणार आहे. यामुळे संमिश्र अनुभव देणार्या या सप्ताहात राशिस्वामी शनीच्या अनुकूल स्थितीमुळे नोकरी व व्यवसायात लाभ, मानसन्मानाचे योग यावेत. मात्र अशातच काही मंडळींभोवती त्यांच्या तीव्र वा कटू बोलण्याने विरोधकांचे कडे उभारले जाऊ शकते. आपला उत्कर्ष संशयाला जागा निर्माण करणारा ठरू शकतो. तेव्हा बेसावध असू नये. सप्ताहाच्या शेवटी आवक-जावकाचा ताळमेळ जमणार नाही. अचानक मोठे खर्च, कुटुंबातील एखाद्याच्या हॉस्पिटलायझेशनची शक्यता निर्माण होऊ शकते.
शुभ दिनांक - २२, २३, २५.
मीन (Pisces Zodiac) : खर्चवाढ, आर्थिक पेच संभव
Weekly Horoscope : आपला राशिस्वामी गुरू सध्या पराक्रम स्थानात असून त्याची भाग्यस्थानावर शुभ दृष्टी आहे. त्यामुळे सध्या लाभ, सुख, समाधानाच्या वाटा विस्तृत झालेल्या दिसतील. याचवेळी पंचम या शुभ स्थानी असलेला मंगळ आपल्याला धडाडीने पुढे जाण्याचे सामर्थ्य देत आहे. व्ययात असलेला शनी खर्चवाढ किंवा काहीसा पेच निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा या स्थितीत चंद्र आपल्या सप्तम स्थानातून भाग्य स्थानापर्यंत भ्रमण करणार आहे. हे भ्रमण या सप्ताहातील संमिश्र ग्रहस्थितीचा अनुभव देणारे राहील. सप्ताहाच्या मध्यात काहींना आर्थिक कोंडी, एखादे मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिशय सावध असावे.
शुभ दिनांक - १९, २४, २५.
मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, ८६००१०५७४६