ॲड सुधीर कोठारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा )पक्षात प्रवेश !

19 Jan 2025 15:28:10
हिंगणघाट,
advocate sudhir kothari वर्धा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते ॲड सुधीर कोठारी यांनी आपल्या हजारो सहकाऱ्यासह अजितदादा पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज शिर्डी येथील राकाच्या अधिवेशनात पक्ष प्रवेश केला.
 

advocate sudhir kothari  
 
 
advocate sudhir kothari यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, राका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते व पक्षाचे अन्य नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी ॲड सुधीर कोठारी यांच्या समवेत कामगार नेते आफताब खान, नरेंद्र थोरात व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ना अजितदादा प्रफुल्ल पटेल व खा. तटकरे यांनी या सर्वांचे स्वागत केले. ॲड कोठारी व अन्य नेत्यांच्या पक्ष प्रवेश मुळे या जिल्ह्यात या पक्षाला व महायुतीला अधिक बळकटी येईल असा विश्वास पक्ष श्रेष्टींनी व्यक्त केला आहे. या प्रवेशावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना ॲड सुधीर कोठारी यांनी आपण मूळ पक्षातच असून या पक्षाच्या स्थापने पासून आम्ही सर्व या पक्षातच कार्यरत आहोत पुढील काळात हा पक्ष अधिक जोमाने वाढविण्यासाठी आपण  अधिक जोमाने परीश्रम करण्याचे मत त्यांनी तभा प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.
 
 
Powered By Sangraha 9.0