आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत करणार

02 Jan 2025 21:25:45
तभा वृत्तसेवा
मुंबई,
Lands in the form of arrears : शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे 4,849 एकर आकारी पड जमिनी शेतकèयांना परत देण्याबाबतचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 220 मध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक शेतकèयांना दिलासा मिळणार आहे.
 
 
aakari
 
 
तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 220 नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या आकारी पड म्हणून शासनजमा करण्यात येतात. अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज 12 वर्षांच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे. तथापि, 12 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती.
 
 
आता अशा जमिनी प्रचलित बाजारमूल्याच्या 25 टक्के रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 220 मध्ये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तसे विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येईल.
Powered By Sangraha 9.0