मुंबई,
Champions Trophy 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. चाहते स्पर्धेच्या सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्याबाबतचे भाकीतही सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्याबद्दल एक भविष्यवाणी केली आहे गावसकर यांनी स्टार प्रतिस्पर्धी संघाबाबत आपले मत मांडले आहे.
Champions Trophy 2025 भारताच्या अलीकडील कामगिरीकडे पाहताना, गावस्कर यांनी जोर दिला की, "2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गमावूनही, भारताने चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी सलग दहा सामने जिंकले," असे माजी भारतीय क्रिकेटर म्हणाले, "भारत एक मजबूत संघ आहे पण पाकिस्तानला याचा फायदा मिळू शकतो. या सामन्यामध्ये पाकिस्तान विजय प्राप्त करणार असेही ते म्हणाले. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आठ संघ आहेत ज्यांना दोन गटांमध्ये विभागले जाईल. अ गटात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे, तर ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. भारताच्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारीला होणार आहे, भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला महान सामना रंगणार आहे.
दोन ग्रुपमध्ये विभागले गेले 8 संघ
Champions Trophy 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार असून ग्रुप ए मध्ये भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश आणि पाकिस्तानचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये अफगानिस्तान, इंग्लंड , दक्षिण अफ्रीका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 15 सामने खेळवले जातील.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य भारतीय संघ
Champions Trophy 2025 रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, सूर्य कुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, ऋषभ पंत
राखीव
Champions Trophy 2025 मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन