महाराष्ट्र क्रीडा मंडळाची विजयी सुरूवात

    दिनांक :21-Jan-2025
Total Views |
- खासदार क्रीडा महोत्सव आट्या-पाट्या स्पर्धा
 
नागपूर, 
'Khasdar Krida Mahotsas' स्पर्धेच्या उद्घाटनीय सामना १४ वर्षाखालील वयोगटातील मुलांचा झाला. या सामन्यात महाराष्ट्र क्रीडा मंडळाने डीएनसी क्लबला नमवून विजयी सुरूवात केली. महाराष्ट्र क्रीडा मंडळने डीएनसी क्लबचा २४-२० ने पराभव केला. १४ वर्षाखालील मुलींच्या सामन्यात वाडीच्या प्रबोधनकार ठाकरे शाळेच्या संघाने पीटीएमएस संघाला मात देऊन विजय मिळविला. खासदार महोत्सवातील जिल्हास्तरीय आट्या-पाट्या स्पर्धेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रवींद्र भुसारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
 
 
ATYAPATYA
 
'Khasdar Krida Mahotsas' कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आट्या-पाट्या महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे होते. याप्रसंगी भारतीय आट्या-पाट्या महासंघाचे सचिव डॉ. दीपक कविश्वर, डॉ. विजय दातारकर, धनवटे नॅशनल कॉलेजचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गोसावी, डॉ.डी.सी.वानखेडे, लखन येरवार, अमित पाठक, पाठक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमर चकोले यांनी केले. प्रास्ताविक सहसंयोजक डॉ. पद्माकर चारमोडे यांनी केले. आभार डॉ. अंकुश घाटे यांनी मानले.