त्या सुवर्ण क्षणांच्या आठवणी तिला वेदना देतात. डोळ्यात आसवांची गर्दी होते. मनात विचारांचा काहुर उठतो. विसरण्याचा प्रयत्न करते, परंतु ते प्रसंग पुन्हा पुन्हा तिला आठवण करून देतात. त्या आठवणी विसरता येतील, असे हृदय तिच्याकडे नाही. त्यामुळे आता या घरी राहायचे असा तिने ठाम निर्णय घेतला. तशी मनाची तयारीही केली. परंतु भरोसा सेलच्या पथकाने आई, बहीण आणि मैत्रीण बनून तिचे समुपदेशन केले आणि ती पुन्हा घरी राहायला गेली. निराश झालेल्या महिलांचे माहेर भरोसा सेल आहे, हे पुन्हा एकदा Bharosa cell भरोसा सेलने सिद्ध करून दिले.
२७ वर्षीय निशा (काल्पनिक नाव) शासकीय नोकरी ती आई-वडिलांना एकुलती एक आहे. त्यामुळे कुटुंबाचे प्रेम तिच्यावर आहेच. तरुण असल्याने रस्त्याने जाताना नजर पडतेच. अशीच एका युवकाची नजर तिच्यावर पडली अन् ती त्याच्या हृदयात ठसली. हळूहळू प्रेम फुलत गेले. स्वप्नांच्या पंखाने प्रेमाने भरारी घेतली. त्यांनी वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगविले. प्रेमाच्या प्रवासात ती दूर निघून गेली, परत येणे होते. अचानक त्यांच्या प्रेमाला नजर लागली अन् त्याने लग्नास नकार दिला. नाही हा शब्दच तिच्या हृदयाला चिरत गेला. ती नैराश्यात जाऊ लागली. मानसिक तणाव वाढत गेला. सुवर्ण क्षणांच्या आठवणी तिला वेदना देत होत्या. तेच ते प्रसंग पाहून ती पुन्हा नैराश्यात जात होती. अशातच आई- वडिलांना तिच्या लग्नाची चिंता सतावत तिला लग्नासाठी आई-वडील तगादा लावत होते. या प्रकारामुळे ती पुन्हा अस्वस्थ व्हायची.
Bharosa cell : यातून बाहेर पडण्यासाठी तिने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आई-वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. परंतु ती आपल्या वेदना कुणाला सांगू शकत नव्हती. ती भरोसा सेलमध्ये पोहोचली. तिच्यापाठोपाठ आई-वडीलही पोहोचले. तिने ठाम निर्णय घेतल्याने आई-वडीलही हतबल होते. भरोसा सेलच्या प्रमुख पोलिस निरीक्षक सीमा सुर्वे आणि त्यांच्या पथकाने त्यावर तोडगा काढला आणि ती घरी जाण्यास तयार झाली. एकुलती एक मुलगी आईवडिलांसोबत असल्याने कुटुंब आनंदी आहे.