बाल अ‍ॅनिमिया तपासणी शिबिर यवतमाळात

21 Jan 2025 21:35:20
यवतमाळ :
Child Anemia Checkup Camp बालरोगतज्ञ संघटनेतर्फे बुधवार, २२ जानेवारीला दमा आणि अशक्तपणा (अ‍ॅनिमिया) मोफत तपासणी शिबिर होत आहे. यात अ. भा. बालरोगशास्त्र संघटनेची अत्याधुनिक बस सकाळी ८ ते १० या वेळेत अंजुमन उर्दू शाळेत आणि सकाळी १० ते १२ कोठारी विद्यालय समर्थवाडी येथे येणार आहे. तपासणी बसमध्ये होणार आहे, अशी माहिती बालरोग संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. संजीव जोशी यांनी दिली.
 
 
Anemia Checkup
 
Child Anemia Checkup Camp : अ. भा. बालरोग संघटनेचे अध्यक्ष नागपूरचे डॉ. वसंत खलटकर यांच्या मार्गदर्शनात मुलांना अशक्तपणापासून मुक्त आणि मुलांमधील दमा नियंत्रित करण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू आहे. या अंतर्गत हा उपक्रम देशभर राबविला जात असून यवतमाळकर पालक बुधवारी याचा घेऊ शकतात. मुलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासून गरजू मुलांना लोहयुक्त औषधे व योग्य आहाराचा सल्ला दिला जातो. यासाठी बालरोग संघटना अधिकारी डॉ. रवींद्र चव्हाण व डॉ. लीना मानकर सहकार्य करत आहेत.
Powered By Sangraha 9.0