साताऱ्यात तयार होणार नवीन महाबळेश्वर?

एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट

    दिनांक :21-Jan-2025
Total Views |
सातारा, 
Deputy Chief Minister Eknath Shinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले आहेत. नाराज झाल्याने एकनाथ शिंदे गावाला गेल्याचा दावा विरोधक करत आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपण नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर (Mahabaleshwar Project) काम करत असल्याचं सांगितलं आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला अनेकदा गावी यावं लागेल असंही ते म्हणाले आहेत. तसंच २३५ गावं अंतर्भुत असून,२९५ गावांनी आणखी मागणी केली आहे. असंही, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
 
 
eknath  shinde
 
 
 
दरम्यान, साताऱ्यातील Deputy Chief Minister Eknath Shinde आपल्या गावी जाण्यावरुन होणाऱ्या टीकेवर ते म्हणाले की, "कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही. मी येथे कामात आहे. नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजक्ट आहे. याच्या मागे लागलो आहे. मी गावी आलो की नाराज झाले असं म्हणतात. पण हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला अनेकदा गावी यावं लागेल, या भागात फिरावं लागेल. प्रतापगडापासून ते पाटणपर्यंत हा मोठा परिसर आहे.२३५ गावं अंतर्भुत आहेत.२९५ गावांनी आणखी मागणी केली आहे. पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी, जी कामं करायची आहेत ती भुमीपूत्र म्हणून घ्यावी लागतील".
पुढे ते Deputy Chief Minister Eknath Shinde म्हणाले, "या भागाचा कायापालट करणं हाच माझा उद्देश आहे. संपूर्ण विकास करणं, महाराष्ट्रात पर्टयटनाला चालना, वाव देणारी ठिकाणं आहेत त्यांना विकसित करणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना जिथे शक्यत आहे त्याची पाहणी करा असं सांगितलं आहे. काही ठिकाणी आम्ही, काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील. या भागाचा विकास, कायापालट करणं, आणि अमूलाग्र बदल घडवणं तसंच इतिहास, संस्कृती जोपासणं, वा़ढवणं हादेखील उद्देश आहे".
 
भरत गोगावले Deputy Chief Minister Eknath Shinde यांच्या नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता, एकनाथ शिंदे म्हणाले की, "अपेक्षा करणं यात वावगं काय? इतकी वर्षं त्यांनी रायगडमध्ये काम केलं आहे. अपेक्षा ठेवणं, मागणी करणं यात काही चुकीचं नाही. महायुतीमध्ये चर्चा करुन मार्ग काढू".