ऊस उत्पादकांना त्रास देणार्‍यांची गय : किसन वानखेडे

21 Jan 2025 20:43:19
- एसडीएम कार्यालयात बैठक

उमरखेड, 
Sugarcane farmer ऊस उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उमरखेडचे आमदार किसन वानखेडे व भाजपा नेते नितीन भुतडा यांनी उमरखेड व महागाव तालुक्यात कार्यरत साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना धारेवर धरले. उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे प्रामुख्याने उपस्थित होते. जळीत उसाला सुपर करण्याची परवानगी देण्यात यावी, जळीत उसालासुद्धा फ्रेश उसाचा दर लागू करावा. उसाची तत्काळ तोड करून वहन करावे, ऊस उत्पादकांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी उपाययोजना करावी या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
 
 
wankede
 
ऊसतोड कामगार पळून गेल्यास त्यांना शेतकरी व वहन गाडीमालक यांना बसणार्‍या आर्थिक भुर्दंडाची हमी संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांनी घ्यावी, अशीही त्यांची मागणी आहे. ज्या परिसरात ऊसतोड करणारे हार्वेस्टिंग मशीन आहे, तेथील पूर्ण ऊसतोड झाल्याशिवाय हार्वेस्टिंग मशीन तेथून हलवू नये. शेतकर्‍यांचे ऊसाचे पेमेंट व तोड वाहतूक ऊस वहन झाल्यानंतर १५ दिवसांत देण्यात यावे. कारखाना बंद झाल्यानंतर ऊसतोड वाहतूक वाहन मालकांचे कमिशन डिपॉझिट एका महिन्याच्या आत देण्यात यावे. तोडमशीन व क्रेन हार्वेस्टरची संख्या वाढविण्यात यावी, याही मागण्या भाजपाने लावून धरल्या.
 
 
Sugarcane farmer ऊस उत्पादकांच्या प्रश्नांबाबत सोमवारी उमरखेड उपविभागीय अधिकार्‍यांच्या दालनात आयोजित बैठकीत सुभाष शुगर फॅक्टरी हडसनी, भैरवनाथ शुगर पोफाळी,नॅचरल शुगर गुंज, डेक्कन शुगर फॅक्टरी बोदेगाव, शिवूर शुगर फॅक्टरी वाकोडी, भाऊराव साखर कारखाना डोंगरकडा, टोकाई सहकारी साखर कारखाना वसमत या सर्व साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना आमच्या ऊस उत्पादकांना त्रास देणार्‍यांची गय केल्या जाणार नाही, असा सज्जड दम यावेळी आमदार किसन वानखेडे यांनी भरला.
Powered By Sangraha 9.0