- १८ लाखांचे चोरीचे साहित्य जप्त
नागपूर,
Theft in plastic company एका बंद प्लॅस्टिक कंपनीचे कुलूप तोडून लाखो रुपये किंमतीचे साहित्य चोरी करणार्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून १८ लाख रुपये किंमतीचे चोरीचे सामान जप्त करण्यात आले. कुदरत खान (५५) रा. टेका, मो. ईकबाल (३५) नवीन कामठी, मो. सलीम (४२) रा. उप्पलवाडी, अरबाज उर्फ शाहरुख कादरी (२५) रा. कवठा, जुनैद अंसारी (३०) रा. टेका, रियाज अंसारी (४२) रा. ताजनगर, वलिद अंसारी (२४) रा. टिमकी, घणश्याम कटरे (४२) रा. कामठी नाका आणि रितेश मेश्राम (३८) रा. यादवनगर अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी पाच आरोपींना अटक पोलिसांना यश मिळाले.
जरीपटका येथील रहिवासी फिर्यादी विशाल विरवानी (३५) रा. जरीपटका असे फिर्यादीचे नाव आहे. विशाल आणि त्यांचे मामा शंकरलाल वासवाणि यांची कवठा, मसाळा येथे छदानी या नावाने प्लॅस्टिक कंपनी आहे. विशाल आणि शंकरलाल यांच्यात वाद झाल्यामुळे मागील एक वर्षांपासून बंद आहे. याच संधीचा फायदा घेत उपरोक्त आरोपींनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथील प्लॅस्टिकचे पाटे, स्टुल, अकरा मशीन, एक कुलमिलकर आदी साहित्य चोरून नेले.
Theft in plastic company फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करताच पोलिस पथकाने तांत्रिक तपास तसेच गोपनिय माहिती मिळवून आरोपी मो. ईकबाल याला ताब्यात घेतले. त्याने उपरोक्त मुद्देमाल आरोपी कुदरत खान, मो.सलीम याच्यासह सहआरोपी अरबाज उर्फ शाहरूख याच्यामार्फत केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले उर्वरीत मुद्देमाल आरोपी अरबाज याच्या मदतीने आरोपी जुनैद, रियाज, जावेद, घनश्याम, रितेश यांनी मिळून चोरी केले. त्यांच्याकडून १८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई पोलिस उपायुक्त निकेतन कमद यांच्या मार्गदर्शनात वपोनि प्रवीण पांडे, सपोनि विनोद मातरे, सचिन पोहवा राजेश जाधव, नरेश उके, प्रताप शेळके, निरंजन सोनपिपरे, अमित शर्मा, निलेश राठोड यांनी केली.