मानोरा,
world of sports : या आकांक्षीत तालुयातील काही तारे क्रीडा विश्वातील जाणकारांच्या मार्गदर्शनात तथा क्रीडापटूच्या चिकाटीमुळे तेजोमय होत असून खेळातील विविध प्रकारात आपले नाव गुरुजन व पालकांच्या प्रोत्साहनामुळे काढत असलेल्या ह्य खेळाडूंमुळे इतरांना प्रेरणादायी वाट मिळण्याचा मार्ग सुखर झालेला आहे.
मानवी जीवन हे संघर्षाने भरलेले असल्याने संघर्षाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या डावपेचाची तालीम विविध क्रीडा प्रकारातून तज्ञ मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार मिळते जी खेळासोबतच भविष्यात सुद्धा उपयोगी पडत असते याचा अप्रत्य पोहरादेवी येथील महसूल कर्मचारी संदीप आडे यांच्या कन्या संस्कृती यांना त्यांचे क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शारीरिक शिक्षक प्रा. रवीभूषण कदम यांच्याकडून सातत्याने ज्युडो क्रीडा प्रकारात मिळालेल्या निशुल्क प्रशिक्षणामुळे शय झाले आहे. world of sports रवीभूषण कदम गुरुजींनी प्रशिक्षित केलेल्या ज्युडो खेळाडूंपैकी आता पावेतो तब्बल ३० पेक्षा अधिक खेळाडू आपल्या खेळाच्या बळावर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवू शकले आहेत पैकी संस्कृती आडे ही एक विद्यार्थिनी आहे.
प्रा. रवीभूषण कदम हे वर्षातील एकही दिवस सुट्टी न घेता समर्पित भावनेने ज्युडोपटू घडविण्यासाठी सकाळ सायंकाळ अविरत प्रशिक्षण कार्यक्रम राबवितात याचा लाभ संस्कृती हिला मुंबई येथील आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सलग दोन वेळा सुवर्ण कामगिरी करता आली. world of sports तद्वतच शिर्डी येथे राज्यस्तरीय आणि झारखंडमध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली एवढेच नव्हे तर नुकतेच राज्याची उपराजधानी नागपूर येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवात ३६ किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांकाचे रजत पदकाला गवसणी घालण्याची किमया प्रा. पदमांच्या मार्गदर्शनातच संस्कृतीने साधल्याने क्रीडापटू व तिचे मार्गदर्शक यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.