कृषि विज्ञान केंद्रें हे ज्ञान विज्ञान, प्रसाराची केंद्रें

22 Jan 2025 12:48:20
नागपूर,
Agricultural Science Centres कृषि विज्ञान केंद्रें ही ज्ञान विज्ञान तसेच नवतंत्रज्ञान प्रसाराची केंद्रें असल्याने विद्यापीठातील विविध संशोधन शेतकर्‍यांपर्यंत महत्त्वाचे कार्य करीत असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी केले.
 
 
 
krushi
 
 
 
महाराष्ट्र पशु Agricultural Science Centres व मत्स्य विज्ञान विद्यापीठा अंतर्गत स्थापित कृषिविज्ञान केंद्र दुधबर्डी येथील प्रशासकिय इमारत व शेतकरी निवासाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. नितीन पाटील, माफसूचे संचालक डॉ.अनिल भिकाने, डॉ.एस. के. शुक्ला, डॉ. एन. जी. पाटील, डॉ. वाय. जी. प्रसाद, डॉ.सारीपुत आदी उपस्थित होते.
 
 
 
माफसूअंतर्गत Agricultural Science Centres दूधबर्डी येथील नवीन कृषी केंद्र पूर्ण क्षमतेने कार्य करून शेतकर्‍यांना माहिती उपलब्ध करुन देतील, असा विश्वास डॉ. भिकाने यांनी व्यक्त केला. शेती व पशुसंवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या १४ प्रगतिशिल शेतकर्‍यांचा याप्रसंगी सत्कार आला. यावेळी, नितिन कुरकुरे, सचिन बोंडे, मोना ठाकूर, मनिषा शेंडे, आरजू सोमकुवर, प्रशांत तेलवेकर, सुनिल गांवडे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0