संशोधन आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विषयावर परिषद!

22 Jan 2025 12:02:43
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयोजन
नागपूर,
Government Engineering College शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर व भारतीय मानक ब्युरो यांच्या संयुक्त वतीने अभियांत्रिकीमध्ये संशोधन आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन (आयसीआरआयपीई) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २३ आणि २४ जानेवारी २०२५ दरम्यान नागपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत भारत आणि इतर देशांतील २०० हून अधिक संशोधक आणि विषय तज्ञ सहभागी होतील. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आयसीआरआयपीई चे सरचिटणीस डॉ. आर. पी. बोरकर यांनी सांगितले की, या परिषदेचे उद्घाटन २३ जानेवारी २०२५ रोजी प्रमुख पाहुणे डॉ. प्रतापसिंह काकासाहेब देसाई, अध्यक्ष, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या हस्ते होईल. या उद्घाटन कार्यक्रमाला अतिथी डी. एन. नंदनवार, मुख्य अभियंता, पीडब्ल्यूडी नागपूर, डॉ. सुदर्शन कुरवाडकर, फुलरटन, यूएसए, हेडस्प्रिंग इंक, जपानचे तांत्रिक सल्लागार डॉ. यासुयुकी निशिदा आणि संदेश गोकनवार, संयुक्त संचालक, भारतीय मानक ब्युरो, नागपूर हे उपस्थित राहतील.
 
 
Government Engineering College
 
या परिषदेत सादर केलेल्या संशोधन पत्रांचा सखोल आढावा घेतल्यानंतर विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये सुमारे १७० शोधनिबंध स्वीकारण्यात आले आहेत. Government Engineering College स्थापत्य अभियांत्रिकी ५०, पांत्रिक अभियांत्रिकी ३४, इलेक्ट्रिकल २८, संगणक विज्ञान ३७ आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार २१ यातील १२६ शोधनिबंध नोंदणीकृत आहेत आणि त्यांचा परिषदेत समावेश करण्यात आला आहे. तर १०४ शोधनिबंध आयएसटीई, नवी दिल्ली यांचे द्वारे इंडियन जर्नल ऑफ टेक्निकल एज्युकेशनमध्ये प्रकाशनासाठी निवडले गेले आहेत. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या उदयोन्मुख कल्पनांना चालना देण्यासाठी भारतीय मानक ब्युरो द्वारे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूरच्या मानक क्लब अंतर्गत पोस्टर स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0