तेलाच्या किमती घटल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबणार

25 Jan 2025 21:25:19
- डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्वास
 
वॉशिंग्टन, 
पेट्रोलियम निर्यातदार संघटना ओपेकने तेलाच्या किमती कमी केल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबी शकते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. स्वित्झर्लंडमधील दाओस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला आभासी संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, रशिया-युक्रेन युद्ध तीन वर्षांपर्यंत लांबण्यासाठी ओपेक संघटनेतील सदस्य देश जबाबदार आहे.
 
 
Donald Trump
 
Donald Trump : या युद्धात दहा लाखांवर नागरिकांनी जीव गमावला असून, आठवड्याला हजारपेक्षा अधिक मृत्यू होत आहेत. यापूर्वी मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो, तर युद्ध होऊच दिले नसते. युद्ध थांबविण्यासाठी ओपेकने तातडीने तेलाचे दर कमी करावे. तेलाच्या किमतीसह कमी करण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करणार कर कपात
जगभरातील प्रत्येक व्यावसायिकासाठी माझा एक स्पष्ट संदेश आहे. तुमचे उत्पादन अमेरिकेत बनवा, आम्ही तुमच्याकडून जगातील कोणत्याही देशापेक्षा कमी कर आकारू. देशात बनवलेल्या उत्पादनांवर किमान कर लावण्यावर काम करीत आहेत. अमेरिका आपली व्यापारी तूट कमी करण्याला प्राधान्य देणार असल्याचे म्हणाले.
Powered By Sangraha 9.0