सुगंधित तंबाखु विक्रेत्यांवर आरमोरी पोलिसांची धाड

* विविध गावातील 40 पानठेला व दुकानदारांवर कारवाई

    दिनांक :25-Jan-2025
Total Views |
आरमोरी, 
Raid on flavored tobacco sellers : सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांवर आरमोरी पोलिसांनी 24 जानेवारीला धाड टाकून 40 पानठेला व दुकानांवर कारवाई करीत 8 हजार रुपयांचा दंड वसूला केला.
 
 
GAD
 
महाराष्ट्र शासनाने सुगंधीत तंबाखु विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला असतांनासुध्दा गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखुची विक्री व वाहतुक करणार्‍यांवर अंकुश बसावा, या उद्देशाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर रेड करुन प्रभावीपणे कायदेशीर कठोर कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिलेल्या आहेत.
 
 
त्याअनुषंगाने आरमोरी पोलिस स्टेशन हद्दीतील आरमोरी, वैरागड, देऊळगाव, वडधा, ठाणेगाव, मानापूर, अरसोडा, बर्डी, वघाडा, जोगीसाखरा व अंतरंजी या गावांमधील शाळापासून 100 मीटर जवळ असलेल्या तसेच गावाच्या मुख्य रस्त्यावर असलेले पानटपरी (पानठेला) व दुकानामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले सुगंधित तंबाखू विक्रीसाठी ठेवत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक गवते यांनी पोलिस पथकासह तपासणी केली असता अल्पशः प्रमाणात सुगंधित तंबाखू मिळून आल्याने 40 पानटपरी (पानठेला) तसेच दुकानदार यांच्यावर कारवाई करुन प्रत्येकी 200 रुपयेप्रमाणे एकुण 8 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच त्यांना आपल्या पानटपरी (पानठेला) व दुकानात सुगंधित तंबाखू न विकण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहे.
 
 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीचे पोलिस निरीक्षक कैलाश गवते यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक नरेश सहारे, दिलीप मोहुर्ले, देवराव कोडापे, सहायक फौजदार गौरकार, पोलिस हवालदार गोन्नाडे, पिल्लेवारन, कुमरे व पोलिस अंमलदार यांनी पार पाडली.