तभा वृत्तसेवा
आर्वी,
Arvi-Police-Muslim आर्वी येथील अॅड. दीपक मोटवाणी आणि करण मोटवाणी यांनी मुस्लिम समाजातील काही लोकांना सोबत घेऊन वसंतनगरातील अजय कदम यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. 10 हजार रोख आणि मुलाच्या बोटातील अंगठी हिसकाविली. Arvi-Police-Muslim ही घटना शनिवार 25 रोजी घडली. विशेष म्हणजे कदम यांची तक्रार नोंदवत गुन्हा दाखल करण्यासाठी आर्वी पोलिसांना दोन दिवस लागले. पहिल्या दिवशी तक्रार दाखलच केली नसल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी कान टोचल्यानंतर आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला हे उल्लेखनिय!
Arvi-Police-Muslim पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसंतनगर येथील अजय कदम यांच्या घरी शनिवार 25 रोजी रात्री 9 वाजता अॅड. दीपक व करण मोटवाणी हे मुस्लिम समाजातील युवकांना घेऊन घरात शिरले. जबरदस्तीने गोदाम, कार्यालय आणि मत्स्त्य पालन असलेल्या खोलीला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. आपण मनाई केली असता कुटुंबीयांवर धावून आले. पत्नी आणि सुनेला धक्काबुक्की करून विनयभंग केला असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. Arvi-Police-Muslim या प्रकरणाची पोलिसात तक्रार देण्यासाठी कदम गेले असता तक्रार घेतल्या गेली नाही. रविवार 26 रोजी सकाळी 10 वाजता या दोघांनी 10 ते 15 मुस्लिम समाजातील लोकांना घेऊन येत घरी येऊन कुटुंबीयांना मारहाण केली.
तसेच दहा हजार रोख आणि मुलाच्या बोटातील सोन्याची अंगठी हिसकावून नेली. कदम यांच्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. कदम यांच्या प्लॉटचा न्यायालयात वाद सुरू आहे. Arvi-Police-Muslim परंतु, सध्याचे राहते घर, कार्यालय आणि गोदामाचा कुठलाही वाद न्यायालयात सुरू नसून आपल्याच ताब्यात आहे. प्लॉट वसंतनगरमध्ये असून बँक ऑफ इंडियाने राकेश खत्री रा. नागपूर यास विक्रीचा करार केला असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.