भंडारा,
Tiger hunts woman : जिल्ह्यातील भंडारा वनविभाग अंतर्गत असलेल्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोन मध्ये वाघाने एका महिलेचा बळी घेतला आहे. आज 29 रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला. दरम्यान महिलेच्या शिकारी नंतर हा वाघ तिच्या मृतदेहा जवळच बसून असल्याचे समजते. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असून वृत लीहेस्तोर वनविभागाचे पथक पोहचले नव्हते.
तालुक्यातील कवलेवाडा येथील नंदा किशोर खंडाते असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव . घटनेनंतर वाघ महिलेच्या मृतदेहापाशी बसून अजून गावकरी गर्दी करून आहेत. वनविभागाला याची माहिती देण्यात आली असून बातमी लिहीपर्यंत पथक पोहोचले नव्हते.