मुंबई,
Homosexual relationship महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे दोन १९ वर्षांच्या मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवर ७० वर्षीय महिला आणि तिच्या ४५ वर्षीय मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर, असे काय घडले की दोन्ही मुलांनी आई व मुलाची निर्घृण हत्या केली, हा खुलासा पोलिसांनी केला आहे.मयत आई व मुलगा नवी मुंबईतील कामोठे परिसरातील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये राहत होते. शुभम महेंद्र नारायणी (१९) व संज्योत मंगेश दोडके (१९) अशी त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले- अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी आधी आम्हाला अनेक कथा सांगितल्या. पण नंतर त्यांनी असा एक किस्सा सांगितला जो ऐकून आम्हालाही आश्चर्य वाटले. आरोपीने सांगितले की, ३१ डिसेंबरच्या रात्री जितेंद्रने दोघांनाही आपल्या घरी पार्टीसाठी बोलावले होते.
![couple couple](https://www.tarunbharat.net/Encyc/2025/1/3/couple_202501031448377393_H@@IGHT_400_W@@IDTH_600.gif)
आरोपी Homosexual relationship म्हणाला- पार्टीदरम्यान, जितेंद्र व त्याच्या आईने माझ्यावर आणि माझ्या मित्रावर समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला.व म्हणाले 'चल, माझ्यासमोर सेक्स कर...' यावरून आमचा त्यांच्याशी वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपी शुभमने सांगितले की, यावेळी त्याने जितेंद्रच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रकरण नवी मुंबईतील कामोठे परिसरातील आहे. येथे दोन १९ वर्षांच्या मुलांनी गीता व जितेंद्र जग्गी यांची हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
गीता जग्गी यांचा गळा कापला
यानंतर, संज्योत Homosexual relationship मनेश याने गीता जग्गी यांचा गळा चिरला. हत्येनंतर दोघांनी घरातील मौल्यवान वस्तू चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांची ओळख पटवून त्यांना उलवे परिसरातून अटक केली.
पुरावा नष्ट करण्यासाठी गॅस लीक
मृत गीता Homosexual relationship आणि जितेंद्र यांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला असून, तेथे एलपीजी गॅसची गळतीही आढळून आली आहे. हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही गळती करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खून व चोरीसह अन्य कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.