बलात्कार करून व्हिडीओ प्रसारीत करणारा गजाआड

04 Jan 2025 21:28:26
अमरावती,
Amravati News : महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या तरूणीवर बलात्कार करून त्याचा व्हिडोओ प्रसारीत करणार्‍या भामट्याला चांदूर बाजार पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. अन्य दोघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणावरून चांदूर बाजार शहरात तणाव निर्माण झाला होता.
 
 
 
DFVGG
 
 
 
चांदूर बाजार पोलिस ठाण्यात २ जानेवारीला १९ वर्षीय तरूणीने तक्रार दिली होती. त्या तक्रारीत तीने कला शाखेत पदवी शिक्षण घेत असून शे. साद ऊर्फ सोफीयान शे. साजीद (वय १९ वर्ष, रा. सर्फाबाद) याच्यासोबत ११ व्या वर्गात असताना ओळख झाली. त्यातून प्रेमसंबंध जुळले. ९ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता दरम्यान चांदूर बाजार तहसील कार्यालयासमोर ते दोघेही भेटले असता आरोपीने फिर्यादीस त्याच्या मित्राच्या चांदूर बाजार येथीलच खोलीवर जबरदस्तीने नेले. त्यानंतर तीला शरीरसुखाची मागणी केली.
 
 
तीने करीता नकार दिला असता आरोपीने तीचे सोबत जबरीने शारिरिक संबंध स्थापित केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीस तिचा अश्लिल व्हिडीओ त्याचे मित्राचे मदतीने तयार केला असल्याचे व घडलेल्या प्रकाराबाबत आई - वडीलांना किंवा इतर कोणालाही सांगितल्यास तो प्रसारीत करून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर ते दोघेही आपआपल्या घरी निघून गेले. फिर्यादी ही घाबरलेली असल्याने तिने घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काहीही सांगीतले नाही. त्यानंतर अंदाजे आठ दिवसानंतर आरोपी शे.साद ऊर्फ सोफीयान शे. साजीद हा फिर्यादीस भेटला व त्याने सांगीतले की, त्याचे दोन अल्पवयीन मित्रांनी अश्लिल व्हीडीओ वायरल केले आहेत. भितीपोटी फिर्यादीने ही माहितीपण कोणाला सांगितली नाही.
 
 
दरम्यान सदर व्हिडीओ फिर्यादीच्या जवळच्या नातेवाईकांना सोशल मिडीयावर आढळून आला. तेव्हा त्यांनी फिर्यादीस विश्वासात घेऊन पोलिसांकडे रितसर तक्रार नोंदविलेली आहे. तक्रारीचे अनुषंगाने पो. स्टे. चांदूर बाजार येथे भारतीय न्याय संहीता व अनुसुचित जाती जमाती प्रतीबंधक कायद्याचे विविध कलमान्वये शे. साद ऊर्फ सोफीयान शे. साजीद व त्याचे दोन अल्पवयीन मित्र यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शे.साद याला अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचे तपासात व्हिडीओ वायरल करणार्‍यांची नावे निष्पन्न करुन पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येते आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक शुभम कुमार करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0