दिव्य-नव्य ‘शक्ती’चा महाकुंभ!

04 Jan 2025 14:26:42
कव्हर स्टोरी
- रेवती जोशी-अंधारे
9850339240
 
 
Women-Mahakumbh-Naga धर्म आणि महिलांच्या श्रद्धेचं एक मजबूत नातं राहिलेलं आहे. हिंदू धर्मातील हजारो वर्षांची परंपरा टिकवून ठेवण्याचं श्रेय, घराघरांतून धर्म-संस्कृतीचा वारसा पुढे नेणाऱ्या  भगिनींना द्यायला हवं. वर्ष 2025 ची सुरुवातच महाकुंभाच्या भव्य, दिव्य आणि नव्य आयोजनाने होत आहे. Women-Mahakumbh-Naga संसारात रमून देवाधर्माचं करणाऱ्या महिलांपासून ते संन्यस्त होऊन भौतिक बंधनांच्या पलीकडे गेलेल्या नागा संप्रदायातील साध्वी, अशी महिलांची दोन टोकाची रूपं याच महाकुंभात बघायला मिळतात. यानिमित्ताने, महाकुंभातील महिलांच्या सक्रीय सहभागाविषयी, त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी, धर्मजागृतीविषयी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या संपूर्ण सक्षमीकरणाचा उहापोह करण्यासाठीचा हा लेखनप्रपंच! 
 
 
 

Women-Mahakumbh-Naga 
 
 
Women-Mahakumbh-Naga यंदाच्या महाकुंभात 53 महिला संतांना महंत आणि महामंडलेश्वर या उपाधी मिळणार आहेत. शब्दश: कोट्यवधी लोकांची उपस्थिती असलेल्या महाकुंभात महिला साधकांची सुरक्षा हा महत्त्वपूर्ण विषय असेल. महिला यात्रेकरूंसाठी पिंक टॅक्सी ही महिला चालकांची वाहन व्यवस्था विशेषत: महाकुंभासाठी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या व्यवस्थांसह संगमावर स्नानासाठीही महिलांसाठी खास व्यवस्था आहे. यंदाच्या महाकुंभात कोणताही प्रोटोकॉल किंवा आखाड्यांना प्राधान्यक्रम नसेल, हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी याआधीच जाहीर केले आहे.
 
 
 
Women-Mahakumbh-Naga जगाच्या कानाकोपऱ्यातून काही सश्रद्ध, आणखी काही अश्रद्ध, काही बघे, हवशे-नवशे, चोर-चपाटे सगळेच महाकुंभात येतात. त्रिवेणी संगमावर स्नान करून, चित्रविचित्र आणि रंगबिरंगी मानव समाजाचं एकत्रीकरण होईल. त्याक्षणी,‘हर गंगे’ म्हणत नदीच्या प्रवाहात बुडी घेत आपला मानवजन्म सार्थकी लावेल. गंगाजलात ओलेत्या देहांवरून स्त्री-पुरुष, जात-पंथ, शिक्षण आणि इतर सामाजिक बंधनं आपोआपच धुतली जातील. उरेल तो केवळ पश्चात्ताप! पाप-पुण्याची आणि ती गंगेच्या पवित्र पाण्याने धुतली जाण्याची कल्पना हिंदू धर्मासोबतच ख्रिस्ती आणि इस्लाममध्येही बघायला मिळते. Women-Mahakumbh-Naga कुणी त्या पाण्याला तीर्थ म्हणेल, कुणी होली वॉटर तर आणखी एखादा आब-ए-झमझम! अशुद्धाला शुद्ध करण्यासोबतच पश्चात्तापाची जाणीवही खूप महत्त्वाची आहे. जेव्हापर्यंत पश्चात्ताप होणार नाही तोपर्यंत पाप धुतले जाणार नाहीत, ही मुलभूत संकल्पना केवळ हिंदू धर्मात सांगितली आहे. विविध पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथसाहित्यात मांडलेली महाकुंभाची ही परंपरा आज ‘वसुधैव कुटुंबकम्’चा मूलमंत्र ठरते आहे.
 
 
 
 
Women-Mahakumbh-Naga प्रत्येक घराची एक इकोसिस्टीम असते आणि त्याची कर्ती घरातील स्त्री असते. दररोज घरासमोरच्या लहानशा रांगोळीपासून ते गुढीपाडव्याच्या श्रीखंडापर्यंत, दिवाळीच्या उटण्यापासून ते होळीच्या रंगांपर्यंत, दिवेलागणीच्या आरती अन् शुभम् करोतीपासून ते नैवेद्याच्या पूर्णब्रम्हापर्यंत सर्वत्र तिची उपस्थिती जाणवते. कोणत्याही देवस्थानात जा, ज्योतिषी, महाराज किंवा गुरूजींकडे जा, तिथे हमखास महिलांची संख्या जास्त दिसते. याचे कारण त्या भोळसट असतात हे नाही तर, चांगल्या जीवनमानाची, स्वत:सोबत कुटूंबाच्या संपूर्ण प्रगतीची त्यांना ओढ असते. त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारीही असते. Women-Mahakumbh-Naga महाकुंभ 2025 हा महिलांच्या सशक्तीकरणाचं माध्यम बनला आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक उन्नतीसोबतच आर्थिक सशक्तीकरणाची संधीही निर्माण झाली आहे. हे वर्ष स्त्रीशक्तीचं आणि शक्तीच्या नेतृत्त्वाचं असेल, यात दुमत नाहीच. याचीच सुरुवात महाकुंभाने होते आहे. महाकुंभात येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला पवित्र गंगाजल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था योगी सरकारने करूत दिली आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अर्थात एनआरएलएमच्या अंतर्गत महिला बचत गट करणार आहेत.
 
 
 
 
Women-Mahakumbh-Naga गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर गंगाजल छोट्या बाटल्या आणि कलशांमधून उपलब्ध करून दिल्या जातील. हे काम 1 हजार प्रशिक्षित महिला करणार आहेत. महिलांच्या स्वयंसहायता बचत गटासाठी हा एक स्टार्ट अप ठरणार आहे कारण, महाकुंभानंतरही त्यांना या प्रशिक्षणाचा फायदा होईल. त्यांचे प्रशिक्षण एव्हाना पूर्ण झालं असून, बस आणि रेल्वे अधिकाèयांसोबतही त्यांचा समन्वय करवून देण्यात आला. तागापासून तयार केलेल्या वस्तू, टोपल्या, लहान डबेदेखील महिला विक्रीस ठेवणार आहेत. महेवा नावाच्या गावातील महिला या वस्तूंची निर्मिती करीत आहेत. महिला बचत गटांना संधी देणं हा एक दूरदर्शी निर्णय ठरणार आहे. Women-Mahakumbh-Naga महाकुंभाविषयी चर्चा करताना, शाही स्नानाचं महत्त्व जाणून घ्यायलाच हवं. नागा आणि इतर साधूंच्या स्नाविषयी बरीच चर्चा होते. पण, महिला साध्वी विशेषत: नागा साध्वीसुद्धा शाही स्नान करतात का? पुरुष नागा साधूंप्रमाणेच नागा साध्वीदेखील कठीण तप आणि गुरूंच्या दीक्षेनंतरच संप्रदायात सहभागी होतात. त्यांचाही आखाडा असतो. गुरूंच्या आज्ञेनुसार त्या स्नान करताना पूर्णत: विवस्त्र असतात. नागा साध्वींचं शाही स्नान पावित्र्य, आस्था आणि आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण असतं.
 
 
 
 
Women-Mahakumbh-Naga शाही स्नानाला निघालेल्या साध्वींची मिरवणूक निघते. त्यांच्या हातात आखाड्याचा ध्वज, त्रिशूळ, इतर शस्त्रं आणि चिमटा असतो. शोभायात्रेनंतर साध्वी शाहीस्नानासाठी संगमावर उतरतात. भक्ती, साधना आणि त्याग या प्रत्येक कसोटीत महिलादेखील पुरुषांइतक्याच सक्षमतेने खऱ्या ठरतात. नागा साध्वी नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरतात. आखाड्यातील इतर सदस्य नागा साध्वीला मातृस्थानी मानतात. दशनम संन्यासिनी आखाडा ख्यातीप्राप्त आहे. या साध्वी केवळ भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. हे शिवलेले नाही तर सलग कापड असते. या कापडाला गंटी म्हणतात. किमान 15 वर्षांचे कठोर ब्रम्हचर्य, स्वत:चे पिंडदान आणि वेळोवेळी गुरूंनी दिलेल्या परीक्षा उत्तीर्ण करीत, स्वत:ला सिद्ध करीत ती संन्यस्त होते. Women-Mahakumbh-Naga बहुतांश सर्वच संस्कृती आणि मान्यतांमध्ये महिलांना मासिक पाळीत अध्यात्मिक उपासना वर्ज्य सांगितली जाते. तशी ती इथेही आहे. मुळात संन्यस्त झालेल्या या साध्वी स्त्रीपुरुष भेदापलिकडे गेलेल्या असतात. मानवी जन्माचं सार्थक करून, अंतिम सत्य गाठण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. दुसरीकडे, संसारात रमलेली सामान्य स्त्रीसुद्धा भौतिक भेद ओलांडून, कुटुंबाच्या उन्नतीसाठी, आत्मोन्नतीसाठी आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी धार्मिक साधना करते. असा हा दिव्य महाकुंभ स्त्रीशक्तीच्या सहभागाने नाविन्यपूर्ण ठरणार आहे.
 
 
रशिया, युक्रेन आणि मैत्री! Women-Mahakumbh-Naga
रशियाच्या साध्वी साशा आणि युक्रेनच्या साध्वी अँटासिया या वर्ष 2013 च्या महाकुंभात भेटल्या. त्यांची मैत्री झाली आणि आज त्या दोघी पुन्हा महाकुंभात आल्या आहेत. त्यांचे देश युद्धात असताना, या दोघी मात्र सनातन धर्माचा प्रचार-प्रसार समर्थपणे करीत आहेत. जुना आखाड्यातील या दोघींपैकी साध्वी साशाला हिंदी बोलता येत नाही, हे विशेष! साध्वी अँटासिया त्यांचे म्हणणे इंग्रजीत अनुवादीत करून, संवाद करतात. या आखाड्यात महिला, पुरुषांसोबतच किन्नरही आहेत. या दोघींसोबतच काही जपानी महिलाही जुन्या आखाड्याच्या साध्वी आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0