जॉर्ज सोरोसला दिलेला सर्वोच्च पुरस्कार हास्यास्पद

05 Jan 2025 21:49:52
- एलन मस्क यांची टीका
 
वॉशिंग्टन, 
Elon Musk : अमेरिकी सरकारने अब्जाधीश उद्योजक जॉर्ज सोरोस यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम पदक देऊन केले. या मुद्यावर टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर सडकून टीका करीत हा निर्णय हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. बायडेन स्वातंत्र्य पदक सोरोस यांना देत आहे, मुळात हा प्रकार विडंबनात्मक आहे, असे मस्क यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेतील नागरी पुरस्कार आहे. तो राजकारण, क्रीडा, मनोरंजन, नागरी हक्क, एलजीबीटीक्यू, वकिली आणि विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींसह यंदा १९ जणांना प्रदान करण्यात आला.
 
 
Elon Musk
 
एक प्रमुख गुंतवणूकदार आणि ओपन सोसायटी फाऊंडेशनचे संस्थापक सोरोस यांना लोकशाही, मानवी हक्क, शिक्षण आणि सामाजिक न्याय बळकट करण्यासाठी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, असे व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटले आहे.
मस्क यांनी सोरोसबद्दलची नाराजी पहिल्यांदाच व्यक्त केलेली नाही. २०२३ मध्ये मस्क यांनी सोरोसवर अनेकवेळा हल्ले केले होते. सोरोस मानवतेचा तिरस्कार करतात आणि सभ्यतेची वीण खराब करणे हा त्यांचा उद्देश आहे, अशी टीका मस्क यांनी केली होती.
 
 
सोरोसची कारकीर्द वादग्रस्त
Elon Musk : सोरोसचा जन्म १९३० मध्ये नाझींच्या ताब्यातील हंगेरीत सोरोसने त्यानंतर मोठी संपत्ती मिळवली आणि ओपन सोसायटी फाऊंडेशनची स्थापना केली. जागतिक राजकारण आणि वित्तीय क्षेत्रातील सोरोसच्या सहभागामुळे तो एक ध्रुवीकरण करणारा ठरला. अनेक देशांतील राजवट उलथवण्याचा, अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा आणि अरब स्प्रिंगसारख्या चळवळींना खतपाणी देण्याचा आरोप त्याच्यावर आहे. १९९७ मध्ये आशियात वित्तीय संकट आणल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
 
 
अदानी समूहालाही  केले लक्ष्य 
अलिकडे अदानी समूहाच्या वादातही त्याचे नाव समोर आले. त्यानेच या समूहाला लक्ष्य केल्याचे सांगितले जाते. यापूर्वी २०२३ मध्ये ऑर्गनाइज्ड क्राईम अ‍ॅण्ड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने आरोप केला की, अदानी समूहाने आपल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी अपारदर्शक पद्धतीने मॉरिशस आधारित निधी वापरला. हे सर्व सोरोसने घडवल्याचा आरोप आहे.
Powered By Sangraha 9.0