यशवंतचे 10 शिक्षक 7 वर्षांपासुन वेतनाविना

*मान्यता नसताना काढल्या जागा

    दिनांक :05-Jan-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Wardha News : वर्धा जिल्ह्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ करणार्‍या बापुरावजी देशमुख यांनी स्थापन केलेल्या यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेतील भोंगळ कारभार माजी आमदार व संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश देशमुख त्यानंतर त्यांचे चिरंजिव अध्यक्ष झाल्यानतंर दररोज बाहेर येत आहे. 11 पैकी 10 जागांसाठी शासनाची परवानगी नसताना भरण्यात आल्या. त्यामुळे 10 शिक्षक 7 वर्षांपासुन विनावेतन काम करीत आहेत.
 
 
 
WARDHA
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार 7 वर्षांपुर्वी यशवंत शिक्षण संस्थेत शिक्षकांसाठी 11 जागाची जाहिरात काढण्यात आली. यात 7 जागा आदिवासी, 3 जागा व्हीजेएनटी व 1 जागा एसस्सीसाठी राखीव असताना 10 जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात आल्या. त्यासाठी आवश्यक ते व्यवहारही झाले. परंतु, वेतन मिळणे कठीण झाले. त्यानंतर सर्व प्राध्यापकांनी शिक्षण विभागाच्या सहाय्यक उपसंचालकांकडे दाद मागितली असता या जागांना परवानगीच नसल्याने अप्रुवल कसे द्यावे असा प्रश्‍न उपस्थित केला.
 
 
पीडित शिक्षकांनी न्यायालयातही गेले. न्यायालयाने दखल घेऊन सहाय्यक उपसंचालकांना वेतना संदर्भात विचारणा केली असता त्यांनी अप्रुवल नसल्याने वेतन देता येत नसल्याचे न्यायालाया सांगितले. आता शिक्षण उपसंचालक अप्रुवल द्यायला तयार नाही. संस्था वेतन देत नसल्याने 10 शिक्षकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. पीडितांनी तत्कालीन अध्यक्ष सुरेश देशमुख यांच्याकडे दाद मागितली असता जागा निघतील अशी आशा दाखवली. त्यानंतर विद्यमान अध्यक्ष समीर देशमुख यांचीही भेट घेतली असता त्यांनीही थांबा करून देतो, असा सल्ला दिल्याचे विश्‍वसनिय सुत्रांनी सांगितले. खुल्या प्रवर्गातील जागा नसल्याने वेतन देता येत नसल्याचे पत्र शिक्षण उपसंचालकांनी दिले. त्यामुळे आता निकषात बसत नाही म्हणून सरकार वेतन देत नाही आणि संस्था लक्ष देत नसल्याने शिक्षकांची गोची होत आहे.