६७३ कामगारांनी केली भाजपची सदस्यता नोंदणी

06 Jan 2025 19:29:47
गोंदिया,
BJP membership registration भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. विजय हरगुडे यांच्या निर्देशानुसार १ ते १५ जानेवारी पर्यंत संपूर्ण राज्यात भाजप सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. यातंर्गत, भाजपच्या कामगार मोर्चाच्या बुथवर ६७३ कामगारांनी सदस्यता नोंदणी केली.
पूर्व विदर्भात १ लक्ष कामगारांना भाजपचे सदस्य म्हणून, नोंदणी करण्याचा संकल्प भाजप कामगार मोर्चाचे विभाग अध्यक्ष धनंजय वैद्य यांनी केला आहे.पूर्व विदर्भातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ५ जानेवारी रोजी कामगार मोर्चाचे पदाधिकारी यांनी बुथ लावून सदस्यता नोंदणी अभियान राबविले. संयोजिका भाग्यश्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुथ स्तरावर सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले.
 
  
bjp
 
 
या श्रृंखलेत BJP membership registration गोंदिया विधानसभा अंतर्गत गांधी वार्डात बुथ लावून सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. या मध्ये परिसरातील २८७ नागरिकांनी भाजपची सदस्यता स्विकारली. तसेच गोंदिया जिल्ह्यात ६७३ नागरिकांनी कामगार मोर्चाच्या बुथ स्टालवर भाजपची सदस्यता नोंदणी केली. या नोंदणी अभियानात कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव तथा पूर्व विदर्भ विभाग अध्यक्ष धनंजय वैद्य, उपाध्यक्ष अशोक चन्ने, जिल्हा महामंत्री गौरव थापा, जिल्हा महामंत्री सचिन शेंद्रे, जिल्हा महामंत्री विनोद ठाकूर, जिल्हा महामंत्री हिवराज मेश्राम, जिल्हा महामंत्री लक्ष्मीकांत हटवार, जिल्हा उपाध्यक्ष बबलू वासनिक, अंकूश वैद्य, गौतम गणवीर, महेश ठवरे, अ. जा. मोर्चाचे मिलींद बागडे, रमा वैद्य आदी पदाधिकारी सहभागी झाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0