गोरेवाडा प्राणी संग्रलायातील प्राण्यांचे माफसूच्या डॉक्टरांनी केली तपासणी

06 Jan 2025 19:14:26
नागपूर,
Gorewada Rescue Centre बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू होण्याची राज्यात ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील सर्व प्राणी संग्रहालयात 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहून गोरेवाडा प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून इतर प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक काळजी घेतली जात आहे. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील सर्व वन्य प्राण्यांची तपासणी आणि काळजी घेण्यासाठी ६ पशुवैद्यकांचे पथक तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे डीन डॉ. शिरीष उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली पिंजऱ्यात बंदिस्त पक्षी व वन्य प्राण्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी, सर्व वन्य प्राणी व पक्ष्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांची रेस्क्यू सेंटरच्या प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल.
 
tiger
 
 
गोरेवाडा रेस्क्यू Gorewada Rescue Centre सेंटरमध्ये पाच प्रजातींचे परीक्षण करण्यात आले आहे. त्यांचे नमुनेही पशुवैद्यकीय पथकाने घेतले आहेत. यांत १२ वाघ, २६ बिबट्या, दोन अस्वल आणि एका पोपटाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. नमुने घेताना पशुवैद्यकीय पथकाने विशेष खबरदारी म्हणून पीपीई किटचा वापर केला. मुख्य वन्यजीव संरक्षण डॉ. विवेक खांडेकर यांनी सांगितले की, एव्हीएन इन्फ्लुएंझा किंवा बर्ड फ्लूच्या विषाणूंमुळे वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती पहिल्यांदाच मिळाली आहे. म्हणून, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. वन्य प्राण्यांकडून मानवाला इजा होऊ नये किंवा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. राज्यात विशेष सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
क्वारंटाईन रूम तयार करण्याचे निर्देश
आठ-दहा Gorewada Rescue Centre दिवसांमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने गोरेवाडा प्रशासनात गोंधळ उडाला होता. वन्य प्राण्यांच्या शरीराचे नमुने भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस येथे पाठवण्यात आले. या वन्य प्राण्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे संस्थेच्या अहवालातून समोर आले. त्यामुळे राज्याचे मुख्य वन्यजीव वॉर्डन डॉ. विवेक खांडेकर यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीचे पालन करण्यासाठी सर्व प्राणिसंग्रहालये, बचाव केंद्रे आणि संक्रमण उपचार केंद्रांच्या प्रशासनाला आदेश दिले आहेत. दरम्यान, बाहेरून येणाऱ्या वन्य प्राण्यांसाठी क्वारंटाईन रूम तयार करून संपूर्ण पिंजरे स्वच्छ करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यावेळी प्राणिसंग्रहालये आणि बचाव केंद्रांमध्ये काम करणाऱ्या कामगार आणि पशुवैद्यकांसाठी काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0