खैबर पख्तुनख्वाने कुर्रममध्ये केले कलम 144 लागू

२ महिन्यांसाठी लागू

    दिनांक :06-Jan-2025
Total Views |
पेशावर,
section144 खैबर पख्तुनख्वाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी कुर्रम जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी कलम 144 लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. कलम 144 अन्वये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. उत्तर-पश्चिम पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या सरकारने सरकारी ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात हिंसाचारग्रस्त कुर्रम जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश (कलम 144) लागू केला आहे. या हल्ल्यात जिल्ह्यातील एक वरिष्ठ अधिकारी जखमी झाला आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 

khyber 
 
पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी
कलम 144 अन्वये खुलेआम शस्त्रे घेऊन फिरणे आणि पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी आहे. तारी आणि छपरी भागातील मुख्य पाराचिनार महामार्गावर सर्व सार्वजनिक सभा आणि रॅलींना बंदी घालण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. जातीय हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या कुर्रम जिल्ह्यात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
 
 
 
जातीय संघर्ष सुरु आहे 
section144 कुर्रम जिल्ह्याचे उपायुक्त जावेदुल्ला मेहसूद आणि इतर सात जण शनिवारी पहाटे खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावरपासून 200 किमी नैऋत्येस असलेल्या बागानजवळील कोझलाई बाबा गावात त्यांच्या लष्करी वाहनांवर गोळीबार करण्यात आला. यापूर्वी 21 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात जातीय संघर्षात 133 जणांचा मृत्यू झाला होता.
 
 
सरकार बक्षीस जाहीर करणार 
section144 पाराचिनारजवळ प्रवासी व्हॅनवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर जातीय संघर्ष सुरू झाला, ज्यामध्ये ५७ लोक मारले गेले. उपायुक्त मेहसूद यांच्या वाहनाला लक्ष्य करणाऱ्या हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बैठकीत हल्लेखोरांवर सरकार बक्षीस जाहीर करेल, असेही ठरले.