ठाणे,
Case registered against women महाराष्ट्रातील ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्याच्या भुंकण्यावरून येथे वाद झाला. कुत्र्याच्या भुंकण्याचा राग आल्याने शेजारील महिलांनी एका पुरुषावर व त्याच्या कुटुंबाला मारहाण केली. यात व्यक्तीसह कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले. ठाणे जिल्ह्यातील आंबिवली परिसरात रविवारी ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, पुरुष व त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याप्रकरणी १० महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला Case registered against women भाजीविक्रेते असून, आरोपी महिला तिच्या शेजारी राहतात. याआधीही काही मुद्द्यांवरून दोघांमध्ये वाद झाले होते. रविवारी सायंकाळी भाजी विक्रेत्याच्या पाळीव कुत्र्याने परिसरात भुंकण्यास सुरुवात केल्याने आरोपी महिला संतप्त झाल्या. यानंतर, त्यांनी थेट पीडितेचे घर गाठून पत्नी आणि मुलीला बेदम मारहाण केली. याशिवाय, आरोपींनी पीडितेच्या घरावर दगडफेक करून घराची तोडफोड केली. या हल्ल्यात पीडित तरुणी आणि त्याचे कुटुंबीय जखमी झाले.
याप्रकरणी, Case registered against women पीडितेने सोमवारी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी १० महिलांविरुद्ध हिंसाचार, बेकायदेशीरपणे एकत्र येणे, खोडसाळपणा करणे, गोंधळ घालणे तसेच जाणूनबुजून घरात घुसून नुकसान करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.