विवेक निमजे व आयुष कोसरे यांचे कराटेत सुयश

    दिनांक :07-Jan-2025
Total Views |
नागपूर,
International Karate Championship : रवीनगरच्या सी.पी. अँड बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ११ वीचे विद्यार्थी विवेक व आयुष कोसरे यांनी इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे चषक पटकाविले. नुकत्याच आग्रा येथे झालेल्या इंडो कंटिन्यू कंटीनेंटल इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत विवेक निमजे याने टीमला उत्तम मार्गदर्शन व नेतृत्व केल्याबद्दल सुवर्णपदक तर आयुष कोसरे याला रौप्य पदक प्रदान करण्यात आले.
 
विवेक निमजे व आयुष कोसरे यांचे कराटेत सुयश
 
त्याचबरोबर नेपाळ, मलेशिया या देशांचा पराजय करत महाराष्ट्राला क्रमांकाचे चषक मिळवून दिले. या स्पर्धेत भारत, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका व मालदीव या देशांचा समावेश होता. International Karate Championship विद्यार्थ्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा रंदई, उपमुख्याध्यापिका नारळे मॅडम पर्यवेक्षिका पुरी मॅडम यांनी त्याच्या यशाबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे शिक्षक प्रदीप राऊत, मानवटकर व ढोले मॅडम यांनीही त्याचे कौतुक केले.