केजीएन फुटबॉल संघाकडून बीग बेनचा संघ पराभूत

07 Jan 2025 14:32:20
नागपूर, 
KGN Football Team-Nagpur : सहयोगनरातील डॉ. आंबेडकर फुटबॉल मैदानावर आज झालेल्या पहिल्या इलाईट डिव्हिजन सामन्यात केजीएन संघाने बीग बेन फुटबॉल संघाचा पराभव केला. नाहिद कुरेशी- १०, तुषार यादव - १५ आणि ४४, तुषार उरकुडे २८ व मोह. अजहर मिनिटात गोल केला. बीग बेनतर्फे खेळाडूंनी बरेच परिश्रम केले, पण त्यांना एकही गोल करण्यात यश मिळाले नाही. शेवटी केजीएनचा विजय झाला. रेफरीने केजीएनतर्फे नाहिद कुरेशी व बीग बेनचा खेळाडू महेन्द्र तायवाडे याला सावधान केले होते.
 
KGN Football Team-Nagpur
 
ओएनएफसीने राहुल अकादमीला हरविले :
सहयोगनरातील डॉ. आंबेडकर फुटबॉल मैदानावर आज झालेल्या दुसर्‍या सिनियर सामन्यात ओएनएफसी फुटबॉल संघाने १-० गोल फरकाने राहुल अकादमी संघाला पराभूत केले. KGN Football Team-Nagpur एका मात्र गोल मुजामिल शेख या ओएनएफसीच्या खेळाडूने २५व्या मिनिटात करत सामना जिंकण्यास मोलाची मदत केली. मात्र राहुल अकादमीतर्फे खेळाडूंना एकही गोल करण्यास यश मिळू शकले नाही.
Powered By Sangraha 9.0