अकोला,
Woman strangled to death : शहरातील जुना हिंगणा परिसरात शेजारी राहणाऱ्या दोन जणांमधे किरकोळ वाद होता. या वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना मंगळवार, 7 जानेवारी रोजी पहाटे घडली.48 वर्षीय सविता ताथोड असे मृत महिलेचे नाव असल्याचे समजते. जुना हिंगणा परिसरात राहणाऱ्या सविता ताथोड आणि धीरज चुंगडे यांच्यात दोन महिन्याआधी किरकोळ वाद झाला होता.
दरम्यान मंगळवारी सविता ताथोड या पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करिता गेल्या असता धीरजने घरापासून काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता ताथोड यांना अडवून गळा आवळला आणि खाली पाडले. सोबत असलेल्या महीलेने आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, धीरज याने ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाळ केलं. Woman strangled to death काही वेळातच सविता ताथोड यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने येथून पळ काढला. अशी माहिती सूत्रांनी दिली. या घटनेनंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहचली असून पुढील तपास करीत आहे. मात्र, किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे.